पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) विद्यार्थी पंचिंग पास बंद करून ‘आॅल रूट’चा ७५० रुपयांचा पास घेणे बंधनकारक केल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात प्रवास करण्यासाठी पीएमपीची बससेवा महत्त्वाची आहे. दररोज हजारो प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पीएमपीएलकडून ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना सवलतीच्या दरात प्रवासी पास दिला जात होता. मात्र, पीएमपीने आता दरवाढीचा बोजा पासधारक प्रवाशांवर टाकला आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी असलेला पंचिंग पास बंद करून गरज नसतानाही आॅल रूटचा ७५० रुपयांचा पास घ्यावा लागत आहे.आॅगस्ट २०१७ मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही वाढ केली गेली. तसेच विद्यार्थ्यांचा पंचिंग पास बंद करून पासचा दर ६०० रुपये होता. तो आता ७५० रुपये करण्यात आला आहे. हा पास बंद केल्याने प्रवासाचे अंतर कमी असेल, तरीही अशा विद्यार्थ्यांना पाससाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. यात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांचे अर्थिक नुकसान होत आहे.पासमुळे अर्थिक भुर्दंडपिंपरी-चिंचवड शहरात मोठमोठी शाळा, महाविद्यालये आहेत. या महाविद्यायात शहरासह लगतच्या भागातील विद्यार्थी दूर अंतरावरूनयेत असतात. अनेक विद्यार्थी एकदाच ये-जा करतात. त्यामुळे असे विद्यार्थी पंचिंग पास काढतात. हे पास विद्यार्थ्यांनाही परवडतात.मात्र, आता हे पास बंद करून ‘आॅल रूट’ चे पास विद्यार्थ्यांच्या माथी मारले जात आहेत.दुसरी बाजूही पाहायला हवीविद्यार्थी पंचिंग पास बंद केला असल्याने काही विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार असून आर्थिक नुकसान होणार आहे. ही नाण्याची एक बाजू असली तरी साडेसातशे रुपयांच्या ‘आॅल रूटच्या’ पासमुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला जाण्यासह क्लासला जाण्यासाठीही वापर करणे सोयीचे होणार आहे. ही नाण्याची दुसरी बाजूही पहायला हवी, असे पीएमपी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.सवलतीची मागणी४सप्टेंबरमध्ये पासचे नूतनीकरण करून घेण्यासाठी गेलेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना जास्तीची रक्कम मागितली जात आहे. विद्यार्थी पंचिंग पास बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. सवलतीचा पास काढायचा असेल तर ७५० रुपयेच द्यावे लागतील असे सांगण्यात येत आहे.
‘आॅल रूट’चा पास माथी, पीएमपीचा प्रवास, विद्यार्थ्यांना ७५० रुपये बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 3:12 AM