पिंपरी - शहरात नियमांचे उल्लंघन करीत स्कूलबस राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. एखादा अपघात झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई होणार का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरटीओ कार्यालयाकडून नियमित बसची तपासणी करण्याची मागणी होत आहे.पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरात प्राथमिक व पूर्वप्राथमिक शाळांचे व शिक्षण संस्थांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्कूल बसच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा नवा मार्ग संस्था चालकांना मिळाला आहे. तसेच, स्कूल बस चालविण्याचा व्यावसाय वाढला आहे. मात्र, या सर्व प्रकारात आरटीओने ठरविलेले नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. मात्र, त्यावर नियमित नियंत्रण ठेवणे व स्कूल बसची तपासणी करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.शहरातील स्कूलबसची तपासणी झालेली नाही, अशी तक्रार पालकांमधून होत आहे. ज्या स्कूलबसनी तपासणी करून घेतली. त्यामध्ये काही स्कूल बसनी केवळ आरटीओच्या तपासणीपुरते नियमांचे पालन केले. ज्या वेळी विद्यार्थ्यांची ने-आण करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस मात्र या स्कूल बसकडून पुन्हा नियमांची पायमल्ली झाली, असा आक्षेप पालकांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांना स्कूलबसची सोय केली आहे. यासाठी अतिरिक्त शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.शाळा व्यवस्थापन समिती कागदावरस्कूलबसमध्ये स्पीड गव्हर्नरसह अग्निशामक यंत्रणा बसविणे आवश्यक आहे़ मात्र शाळा व्यवस्थापन समिती ही नावापुरती व कागदोपत्री स्थापन होते. एखाद्या वेळेस बसला अचानक आग लागली आणि उपाययोजनेची यंत्रणा नसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी भीती पालकांमधून व्यक्त होत आहे. अनेकवेळा बसमधून विद्यार्थ्यांना अक्षरश: दाटीवाटीने बसमध्ये बसविण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसला जाळी लावावी लागते़ परंतु ब-याच बसेसला जाळ्या नाहीत.चºहोलीच्या घटनेनंतरही नाही दखल४चºहोली येथील एका शाळेतील विद्यार्थी रंगपंचमी खेळताना बसमधून खाली पडला. त्यामध्ये अपघात होऊन त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या बसमध्ये वाहक नव्हता. ही गंभीर घटना घडल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. विद्यार्थ्यांना बसमध्ये चढताना आणि उतरताना अपघात होऊ नये म्हणून वाहक नेमण्याची गरज असते. मात्र, शाळा व्यवस्थापन पैसे वाचविण्यासाठी वाहक नेमत नाहीत. त्याचप्रमाणे बसमध्ये प्रथमोचार पेटीची आवश्यकता आहे.आपल्या पाल्याच्या शाळेच्या बसमध्ये आवश्यक सोयीसुविधा आहेत का याची दखल पालकांनी घेतली पाहिजे. नसेल तर शाळा व्यवस्थापनाकडे पालकांनी विचारणा केली पाहिजे. त्यांनी योग्य दखल न घेतल्यास परिवहन विभागाकडे तक्रार करावी. त्याची तातडीने दखल घेऊन आरटीओकडून संबंधित संस्था चालक व स्कूलबस मालकांवर कारवाई करण्यात येईल. - आंनद पाटील,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
स्कूल बसकडून नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 3:29 AM