शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

प्रवाशांच्या मदतीसाठी धावले कार्यकर्ते, चिंचवड स्थानकावर खोळंबल्या गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 6:26 AM

संततधार पावसामुळे मंगळवारी मुंबईतील जनजीवन ठप्प झाले. रुळावर पाणी साचल्याने विविध रेल्वे मार्गावरील रेल्वे तब्बल दहा तासांहून अधिक वेळ खोळंबल्या.

चिंचवड : संततधार पावसामुळे मंगळवारी मुंबईतील जनजीवन ठप्प झाले. रुळावर पाणी साचल्याने विविध रेल्वे मार्गावरील रेल्वे तब्बल दहा तासांहून अधिक वेळ खोळंबल्या. त्याचा विपरीत परिणाम मुंबईसह पुणे रेल्वेमार्गावरही जाणवला. मुंबईहून सुटलेल्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यानियमित वेळपेक्षा कितीतरी अधिक वेळाच्या विलंबाने धावल्या. मंगळवारी रात्री आकुर्डी, तळेगाव आदी स्टेशनवर तासन्तास गाड्या उभ्या होत्या. चिंचवड रेल्वे स्थानकावर तर बुधवारी दुपारपर्यंत रेल्वे उभ्या असल्याचे दिसून आले. शहरातील कार्यर्त्यांनी धाव घेऊन प्रवाशांना चहा, नाष्टा दिला.मुंबईतून सुटणाºया रेल्वे गाड्या मंगळवारी तब्बल दहा तास उशिरा धावल्या. मुंबईहून लोणावळा, तळेगाव, चिंचवड, पुणे मार्गे धावणा-या चेन्नई एक्स्प्रेस, कोईमतूर, विशाखापट्टनम, कोणार्क, कारायकल, कन्याकुमारी या एक्स्प्रेस गाड्या नियमित वेळेपेक्षा १० ते ११ तासांनी चिंचवडला पोहोचल्या. या एक्स्प्रेसने प्रवास करण्यास चिंचवड येथे आलेले अनेक प्रवासी प्रतीक्षा करून निघून गेले. तर मुंबईत रेल्वेत बसून निघालेले प्रवासी रात्री दहानंतर चिंचवडला आले. चिंचवडला आगोदरच काही गाड्या उभ्या होत्या. रेल्वे स्थानकाऐवजी आतील बाजूच्या रुळावर थांबलेल्या रेल्वेतील प्रवाशांची चिंचवडला गाडी थांबल्यानंतर धावाधाव झाली. कोणी पिण्याचे पाणीआणण्यासाठी तर कोणी खाद्यपदार्थ कोठे मिळतील याची शोधाशोध करताना दिसून येत होते.मुंबईपासूनच ठिकठिकाणी थांबत आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्याने स्थानिक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले. लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा लोकलने प्रवास करणाºया प्रवाशांचेही हाल झाले.प्रवाशांना पाहुणचारलांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत असल्याने अनेक गाड्या चिंचवड स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या. प्रवाशांचे होणारे हाल विचारात घेऊन नगरसेवक तुषार हिंगे, रेल्वे प्रवासी ग्रुप च्या हर्षा शहा, आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवाराचे सभासद, शहारातील विविध संस्थेचे कार्यकर्ते या प्रवाशांच्या मदतीला धावून आले. प्रवाशांना चहा, पाणी व बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. गैरसोईने त्रस्त झालेले प्रवासी स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाहुणचाराने सुखावले. त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. प्रवाशांच्या सेवेसाठी विनोद जैन, दीपक चोपडा, राकेश नायर, पद्मनाथन शेट्टी, शिवराज चिखले, विशाल बाबर, गणेश भोसले यांनीही योगदान दिले.चौघडा वादक रमेश पांचगे यांच्याकडून मदतकामानिमित्त बुधवारी सकाळी प्रसिद्ध चौघडावादक रमेश पाचंगे लोणावळ्याला गेले होते. त्या ठिकाणी बराचवेळ थांबलेल्या रेल्वेगाडयांतील प्रवासी गैरसोईने त्रस्त झाले होते. पाणी आणण्यासाठी अथवा काही खाद्यपदार्थ घेऊन येण्यासाठी गाडीतून बाहेर पडावे तर अचानक गाडी सुरू होऊन आपली गाडी सुटू शकते. कुटुंबासह प्रवास करणारे प्रवासी लहान मुले, महिलांना सोडून जाऊ शकत नव्हते. अशा प्रवाशांना चौघडावादक पाचंगे यांनी स्वत: पाण्याच्या बाटल्या नेऊन दिल्या. लहान मुलांना खाऊवाटप केला. गैरसोईच्या संकटात सापडलेल्या प्रवाशांना मदत करता आली, याचे पाचंगे यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे