शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

बालाजीचरणी सलग दुसऱ्या वर्षी साई भजन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 3:07 AM

येथील साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या भजनी मंडळाने तिरुपती येथे सलग दुसऱ्या वर्षी साई भजन सेवा बालाजी चरणी अर्पण करण्यात आली.

शिरगाव : येथील साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या भजनी मंडळाने तिरुपती येथे सलग दुसऱ्या वर्षी साई भजन सेवा बालाजी चरणी अर्पण करण्यात आली.साईबाबांच्या भजनाबरोबर विविध भाषेतील भजने व अभंग, गौळणी, भावगीतांचा या सेवेत समावेश असल्याने भाविकांची गर्दी होती, अशी माहिती साईभक्त नंदकुमार जाधव यांनी दिली. या कार्यक्रमाल तिरुमला देवस्थानकडून प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती प्रतिशिर्डीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे यांनी दिली.पखवाज वादक प्रणीत गावस्कर, गायक वैभव रसाळ, रमेश भुजबळ, ढोलकी वादक अनिकेत गिरी, रितेश करणूक, ओमकार झिमगरे, शुभम उगळे, सनई वादक कल्याणनप्पा सहभागी झाले होते. नंदकुमार जाधव, राकेश मुगळे, शालीग्राम खोसे, विकास पतंगे, भीमराव जगताप, साईबाबा मंदिराचे व्यवस्थापक, अनिल देवकर, गणेश कपिले, विजय लोखंडे, अप्पा वावरे, दत्ता गडेकर, सुरेश ढमढेरे, प्रतीक कोंडालकर, सदा इंगळे, श्रीकांत पाटील, दिलीप कदम, रमेश थोरवे, संतोष चव्हाण, मनोज पंडित आदींनी सहभाग घेतला.पिंपरी पुणे व शिरगाव या परिसरातील मंडळींनी भजनसेवा दिली. बालाजी येथे जाऊन महाराष्ट्रातील कोणत्याच भजनी मंडळानी असा कार्यक्रम केला नव्हता. त्यामुळे व्यवस्थापनाने कार्यक्रमाचे कौतुक केले व पुढील वर्षी आवर्जून येण्याचे आमंत्रण दिले. अशा प्रकारचा कार्यक्रम बालाजी मंदिरात होण्याची पहिलीच वेळ होती. मराठी, हिंदी भावगीतांचा कार्यक्रम असल्यामुळे तेथील मंदिर परिसर साईमय झाला होता.तेथील प्रादेशिक भाषिकानींही भजने भक्तिभावाने ऐकत कलाकारांना दाद दिली. भजनाच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण तेथील स्थानिक दूरचित्रवाहिनीवर दाखविण्यात आले. साईभजानांबरोबर बालाजीचे भजन, पांडुरंगाच्या भजनांनी परिसर दुमदुमून गेला. काही श्रोते तर स्वत: सहभागी झाले. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांत साईबाबांचे असंख्य निस्सीम भक्त आहेत. महाराष्ट्रातील लोकांची बालाजीवर श्रद्धा आहे. माजी आमदार प्रकाश देवळे व सचिव सपना लालचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.