शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

सतीश शेट्टी खून प्रकरण : सीबीआय यंत्रणाही तपासकामात अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 2:13 AM

माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला ९ वर्षांचा कालावधी उलटूनही मारेकऱ्यांचा तपास लावण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेस अपयश आले, अशी खंत सतीश शेट्टी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्ताने एकत्रित आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

तळेगाव दाभाडे : माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला ९ वर्षांचा कालावधी उलटूनही मारेकऱ्यांचा तपास लावण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेस अपयश आले, अशी खंत सतीश शेट्टी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्ताने एकत्रित आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर पुन्हा याप्रकरणी तपास व्हावा, अशी मागणी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.तळेगाव येथे स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण माने, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम जगताप, विजय महाजन, जमीर नालबंद, राजेंद्र जव्हेरी, किशोर कवडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सतीश शेट्टी यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यात आला.तळेगावात १३ जानेवारी २०१० मध्ये धारदार शस्त्राने वार करून दिवसाढवळ्या शेट्टी यांचा खून करण्यात आला. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगतच्या ओझर्डे व पिंपोळीतील शेतकºयांच्या शेकडो एकर जमिनी बेकायदा मार्गाने बळकावल्याची माहिती मिळाल्याने शेट्टी यांनी याबाबत आवाज उठविला होता. माहिती अधिकारातून मिळालेल्या कगदपत्रांच्या आधारे त्यांनी पाठपुरावा केला. आठशे एकर जमिनीचे भूसंपादन रद्द करावे लागले होते. त्यानंतर शेट्टी यांना धमक्या आल्या होत्या. त्यांनी २००९ मध्ये पोलीस संरक्षणाची मागणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली होती़ मात्र, संरक्षण मिळण्याआधीच तळेगावात त्यांची हत्या करण्यात आली. शेट्टी यांनी माहिती अधिकारांतर्गत सरकारी जमिनीचा घोटाळाही उघडकीस आणला होता. या खूनप्रकरणी पोलीस यंत्रणेकडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याची तक्रार सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी केली होती. उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयने २०१४ मध्ये वडगाव न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. शेट्टी यांच्या मारेकºयांचा शोध घेण्यात तपास यंत्रणांना अपयश आले. सीबीआयकडे तपास देऊनही नऊ वर्षांच्या कालावधीनंतर काहीच निष्पन्न झाले नाही. याबद्दल आरटीआय कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे.>शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढणारसतीश शेट्टी हत्या प्रकरणातील सीबीआयने दिलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात उच्य न्यायालयात दाद मागितली आहे. पुढील आठवड्यात या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होईल. तपास यंत्रणांनी हात टेकले असले तरी बंधू सतीश शेट्टी यांच्या मारेकºयांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. तपासयंत्रणेने चुकीच्या पद्धतीने काम केले आहे. आर्थिक सौदेबाजीचा खेळ झाल्याचा संशय आहे. सीबीआयने तपास थांबवला तरी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास कायम आहे. जिवात जीव असेपर्यंत न्याय मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे संदीप शेट्टी यांनी सांगितले.