लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाची सकाळपासून संततधार सुरू होती. मात्र, पवना धरण परिसरात मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस पडला. त्यामुळे पवनेचा साठ्यात १.३६ टक्के इतकी वाढ झाली आहे. एक जूनपासून धरण परिसरात ३६८ मिली पाऊस पडल्याने २३.७७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे. मावळात सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरु वात झाली होती. पवन व नाणे मावळ परिसरात संततधार पावसामुळे भाताच्या लागवडीचा जोर वाढला आहे. कासारसाई धरण पसिरातही पावसाचा जोर आहे. पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर पावसाची भुरभुर सुरू होती. त्यामुळे शहरात गारवा पसरला. अनेक दिवसांपासून उकाड्यामुळे हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. मुसळधार पावसाचा फटका प्रवशांसह कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांना कोंडीला सामोरे जावे लागले. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे दिवसभर नागरिकांना फिरताना रेनकोट व छत्रीचा आधार घ्यावा लागला.
पवना धरण परिसरात संततधार
By admin | Published: June 28, 2017 4:15 AM