पुणे : खासगी परवानाधारक वाहनांचा रंग बदलून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या, तसेच स्कूलबसचा परवाना नसताना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असून, वाहनमालकांना आरटीओचा तसेच न्यायालयाचादेखील दंड भरावा लागणार आहे. आरटीओ प्रशासनाने शहरातील स्कूलबस तपासणी विशेष मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी १३२ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील दोषी ६० वाहने जप्त करण्यात आली. दोषी १८ वाहनधारकांकडून १ लाख १५ हजार ९२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी पाच पथकांद्वारे ७० स्कूलबस, तसेच व्हॅनची तपासणी करण्यात आली. २५ स्कूलबसवर जप्तीची कारवाई करण्यात आली. गुरुवारी ११ वाहनांवर कारवाई करून ९९ हजार ५८९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेदरम्यान विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसताना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात आले. (प्रतिनिधी)
स्कूलबसचालकांवर खटले दाखल होणार?
By admin | Published: December 26, 2016 3:11 AM