राजगुरुनगर : शालेय पोषण आहार योजनेला गतिमान करण्यासाठी व योजना पारदर्शक करण्यासाठी सर्व माहिती आॅनलाइन करायाचा निर्णय शिक्षण आयुक्तांनी घेतला आहे. परंतु, बिल जिल्हास्तारावर अदा करावयाचे का, तालुका सरावर याचा निर्णय न झाल्याने शालेय पोषण आहाराचे बिल गेल्या ८ महिन्यांपासून रखडले असून शालेय पोषण आहार बनविणारे मेटाकुटीला आले आहे. शालेय पोषण आहाराचे बिल आॅगस्ट महिन्यापासुन रखडले आहे. बिल रखडल्याची अनेक कारणे असली तरी शालेय पोषण आहार पुराविनाऱ्या अनेक संस्था व महिला बचत गट अडचणीत आल्या आहेत. (वार्ताहर)
शालेय पोषण आहाराचे रखडले बिल
By admin | Published: March 23, 2017 4:18 AM