शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

नेहरुनगर, वल्लभनगरातील शाळांची दुरवस्था

By admin | Published: July 08, 2017 2:19 AM

प्रभारी मुख्यध्यापकांवर चालतो शाळेचा कारभार... शिक्षक कमी असल्यामुळे एकाच वर्गात भरतात दोन इयत्तांचे वर्ग... ओल्या

नेहरुनगर : प्रभारी मुख्यध्यापकांवर चालतो शाळेचा कारभार... शिक्षक कमी असल्यामुळे एकाच वर्गात भरतात दोन इयत्तांचे वर्ग... ओल्या चिंब वर्ग खोल्यात चिमुकल्या विद्यार्थांना लिहावे लागते ह्यअ, ब, क, डह्ण.... लहान मुलांना खेळायला खेळणी नाहीत... अस्वच्छतेमुळे विद्यार्थांना होतोय मच्छरांचा त्रास... शाळेचे मैदान बनले जंगल...ही परिस्थिती आहे नेहरुनगर, वल्लभनगर येथील महानगरपालिकेच्या शाळेची़ लोकमतच्या प्रतिनिधीने शाळेच्या आवारात केलेल्या पाहणीमध्ये या समस्या समोर आल्या आहेत. अशा कारणामुळेच अनेक महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थांचा टक्का कमी होऊन अनेक पालक आपल्या पाल्यांना चांगल्या शिक्षणासाठी सर्व सोयीयुक्त असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेत असल्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे कल वाढला आहे.नेहरुनगर येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चार इमारती असून या इमारतीमध्ये सकाळ व दुपार सत्रात एकूण ६ वर्ग भरतात़ तर बालवाडी चे ३ वर्ग खोल्या आहेत. बालवाडी च्या ३ वर्ग खोल्या असून या मधील दोन वर्ग खोल्या पाऊसामुळे गळत असल्यामुळे शिक्षणाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या बालवाडीच्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना गळक्या ओल्या चिंब होणाऱ्या वर्ग खोलीतच शिक्षणाचे बाराखडी शिकावी लागत आहे. याच बरोबर या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत खेळण्यासाठी खेळणीदेखील नसल्यामुळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे.मुले क्रमांक २ व कन्या शाळा या शाळेमध्ये दुपारच्या सत्रात लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता या शाळेला गेल्या वर्ष भरापासून पूर्णवेळ मुख्यध्यापक नसल्याचे समोर आले. गेल्या वर्षभरापासून शाळेचा कारभार प्रभारी मुख्यध्यापक म्हणून दिलीप जाधव पाहत आहेत. ते सध्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवीत असल्यामुळे एकाच वेळी त्यांना दुहेरी भूमिका बजवावी लागत आहे. याच बरोबर या शाळेमधील अनेक वर्ग खोल्यांची रंग रंगोटी खराब झालेली आहे, अनेक वर्ग खोल्यांमधील खिडक्यांची दुरवस्था झालेली आहे. शाळेमधील महाराष्ट्राच्या नकाशाची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून, या नकाशाची रंग रंगोटी गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाली असून कोणता जिल्हा कोठे आहे, हे सुद्धा या नकाशामध्ये दिसत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील जिल्ह्यांची ओळख होणार कशी? असा प्रश्न नकाशाला पाहिल्यावर पडतो. अनेक मुलांना बसण्याकरिता बेंच नसल्यामुळे त्यांना सतरंजीवर बसावे लागत आहे. या मैदानातील भंगार साहित्य उचलून नेले आहे. मात्र या ठिकाणी फायबरच्या कचराकुंड्या उचलून नेल्या नसल्यामुळे या कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढले असल्यामुळे मैदानाला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेचे मैदान बनले जंगल?वल्लभनगर येथील पंडित दीनदयाळ माध्यमिक शाळेमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत शाळा असून, अनेक मुले-मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेच्या मैदानात शहरातील इतर शाळांतील मोडकळीस आलेले बेंच, इतर भंगार वस्तू या मैदानात आणून टाकल्यामुळे या शाळेच्या मैदानाला भंगाराचे गोदामाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भंगारामुळे विद्यार्थ्यांना पीटीच्या तासाच्या वेळी फुटबॉल, क्रिकेट, खोखो, शर्यत, इतर मैदानी खेळताना मैदान अपुरे पडत आहे. वर्गाच्या भिंती ओल्या; एकाच वर्गात पहिली, तिसरीचा वर्गपंडित जवाहर लाल नेहरू मुले क्रमांक या शाळेमध्ये १ ली ते ७ वी पर्यंत शाळा असून या शाळेत एकूण १८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये अनेक वर्गाची रंग रंगोटी खराब झाली असून अनेक वर्गात पावसाचे पाणी भिंतीमध्ये झिरपत असल्यामुळे वर्गाच्या भिंती ओल्या चिंब होत आहेत. तसेच या शाळेत ३ री व ४ थी च्या वर्गाला शिक्षक नसल्यामुळे शिक्षकांना नाईलाजस्तव एकाच वर्गात पहिली व तिसरीचा वर्ग व दुसऱ्या वर्गात दुसरी व चौथीचा वर्ग भरवावा लागत आहे. यामुळे त्यांच्या शिक्षणाचा दर्जा खलावत असून त्यांच्या शिक्षणाचा दर्जा कसा उंचावेल असा प्रश्न? उपस्थित केला जात आहे.