चिंचवड : येथे लोकमान्य रुग्णालयाजवळील जलवाहिनीचा एअरव्हॉल्व्ह अज्ञातांनी तोडून चोरून नेल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. तर वाहनाच्या धडकेत व्हॉल्व्ह निघाल्याने पाणी वाया गेल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणने आहे़ याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.चिंचवड स्टेशनकडून चिंचवड गावात जाणाºया रस्त्यावर महापालिकेचे स्वच्छतागृह आहे. त्या शेजारीच जलवाहिनीचा व्हॉल्व्ह आहे. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास या ठिकाणी पंधरा ते वीस फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी साचले होते.नागरिकांना काही काळ वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी याबाबतची माहिती प्रशासनास कळविल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी पाणीपुरवठा खंडित केला आणि व्हॉल्व्हची दुरुस्ती केली. मात्र, लाखो लिटर पाणी वाया गेले. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रकाशित केले. त्यानंतर हा प्रकार का व कसा घडला, याची चौकशी महापालिका प्रशासन करीत आहे.
प्रशासनाकडून शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:30 AM