शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

राष्ट्रवादीला उमेदवाराचा शोध

By admin | Published: October 15, 2016 3:14 AM

मोशी गावठाण, चऱ्होली, डुडुळगाव अशा तीन गावांचा परिसर मिळून प्रभाग क्रमांक तीन तयार झाला आहे. ग्रामीण भागांचा मोठ्या प्रमाणावर समावेश

पिंपरी : मोशी गावठाण, चऱ्होली, डुडुळगाव अशा तीन गावांचा परिसर मिळून प्रभाग क्रमांक तीन तयार झाला आहे. ग्रामीण भागांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आरक्षणांचा रखडलेला विकास ही येथील प्रमुख समस्या आहे. नव्याने विकसित झालेल्या भागात मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू सोसायट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण आणि ओबीसीसाठी दोन जागा आरक्षित आहेत. खुल्या आणि ओबीसी गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा म्हणजेच मोशी प्रभाग आणि प्रभाग क्रमांक सात चऱ्होली मिळून यंदाचा प्रभाग क्रमांक तीन झाला आहे. इंद्रायणी नदी आणि प्रमुख रस्त्यांचा आधार घेऊन नवीन प्रभाग झाला आहे. मोशी जकात नाक्यासमोरील पुलापासून इंद्रायणी नदीने आळंदीची हद्द, देहूगाव नाका, चऱ्होली गावठाण, निरगुडी आणि पुढे लोहगाव आणि लष्करी हद्दीने पुणे-आळंदी रस्त्यापर्यंत, पुढे संत ज्ञानेश्वरनगर, दिघी, मॅगझिन हद्दीने गंधर्वनगरी, केंद्रीय विहार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची विरुद्ध बाजूने मोशी गावठाण, पुढे मोशी नाक्यापर्यंतचा भाग या भागात जोडला आहे. नकाशात भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग मोठा दिसतो. याचे प्रमुख कारण समाविष्ट गावांचा भाग अधिक असल्याने मोकळ्या जागा अधिक आहेत. गेल्या वेळी मोशी प्रभागातून राष्ट्रवादीच्या मंदा आल्हाट आणि शिवसेनेचे धनंजय आल्हाट आणि चऱ्होली प्रभागातून राष्ट्रवादीकडून विनया तापकीर आणि नितीन काळजे निवडून आले होते. नवीन प्रभागरचनेत मोशी गावाचे दोन भागांत विभाजन केले आहे. मात्र, चऱ्होली आणि डुडुळगाव या गावांचा पूर्णपणे समावेश केला आहे. मोशी आणि चऱ्होली परिसरात ओबीसी मतदारांची संख्या अधिक आहे. मंदा आल्हाट आणि धनंजय आल्हाट या दोन्ही नगरसेवकांना प्रभाग दोन आणि तीन अशा दोन्ही ठिकाणी संधी आहे. तसेच सर्वसाधारणसाठी दोन जागा राखीव असल्याने चऱ्होलीच्या दोन्ही नगरसेवकांना संधी आहे. गावांचा परिसर अधिक असला, तरी नवीन विकसित झालेल्या सोसायट्यांची संख्या अधिक झाली आहे. गाववाल्यांपेक्षा बाहेरून आलेल्यांची संख्या अधिक झाली आहे. मध्यमवर्गीय उच्चभ्रूंचे मतदान निर्णायक ठरणार आहे. समाविष्ट गावांत अजूनही विकासाची गंगा पोहोचलेली नाही. रस्ते, शाळा, उद्याने आदी आरक्षणे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वेळी या प्रभागातून राष्ट्रवादीला तीन आणि शिवसेनेला एक जागा मिळाली होती. या भागात विद्यमान आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांचे वर्चस्व आहे. नितीन काळजे हे आमदार लांडगेंच्या संपर्कात आहेत. लांडगे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला येथून नवीन उमेदवार शोधावा लागणार आहेत. येथील जागा ओबीसी आणि सर्वसाधारणसाठी राखीव असल्याने उमेदवारासाठी सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे. (प्रतिनिधी)