पिंपरी : पुणे शहर अथवा ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दबावाला पोलीस कर्मचाºयांनी बळी पडू नये, याबाबतचे वायरलेसवरील संभाषण मोबाइलच्या माध्यमातून ज्याने व्हायरल केले, त्याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील मकरंद रानडे यांचा आॅडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या विषयी रानडे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. ते म्हणाले, ‘‘वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी कामकाजासंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करायचे असते. मात्र कोणीतरी अंतर्गत कामकाजाबाबतचे संभाषण व्हायरल केले. अशा प्रकारचे वर्तन गैर आहे. पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस यांच्याशी योग्य समन्वय ठेवूनच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे कामकाज केले जाणार आहे. त्यात दुमत असण्याचे कारण नाही. १५ आॅगस्ट २०१८ ला स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. अद्याप पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. आयुक्तालयाचे कामकाज करण्यासाठी काही सुविधा पुरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू होण्यास थोडा अवधी लागणार आहे. पुणे आणि ग्रामीण पोलीस अधिकाºयांशी आपला चांगल्या प्रकारे समन्वय आहे. स्वतंत्र सायबर सेल लवकरचसायबर गुन्ह्यासंबंधीच्या तक्रारी नोंदविण्यासाठी अद्यापही पुण्यात जावे लागते. तक्रार नोंदविणाºयांची संभ्रमावस्था होते. पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्याशी पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर लॅब आणि सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने शहरात लवकरच सायबर लॅब आणि सायबर पोलीस ठाणे सुरू होईल.विघ्नहर्ता न्यास कार्यरतपुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत गणेशोत्सव मंडळांसाठी दर वर्षी स्पर्धा घेतली जाते. गणेशोत्सव मंडळांच्या सजावटी, देखाव्यांचे परीक्षण करून उत्कृष्ट सजावट करणाºया मंडळांना बक्षीस देऊन गौरविण्यात येते. त्याच धर्तीवर या वर्षीपासून पिंपरी-चिंचवडमधील गणेशोत्सव मंडळांसाठी पोलीस आयुक्तालयामार्फत विघ्नहर्ता न्यासाच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात स्पर्धा घेण्यात येणार आहे. महापालिका आणि पोलीस यांच्यातर्फे गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. विविध पोलीस ठाण्यांतर्गत मंडळांच्या बैठका घेण्यात येत आहेत. त्यांना गणेशोत्सव काळात घ्यावयाची दक्षता याबाबत सूचना देण्यात येत आहेत. दहीहंडी, मोहरम आणि गणेशोत्सव हे उत्सव लागोपाठ आले असल्याने बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.