पिंपरी : महापालिका मुख्य इमारत, वायसीएम रुग्णालयासह शहरातील सात रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था अद्यावयत करण्याचे काम सुरू आहे. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, वाढीव सुरक्षा कर्मचारी, वॉकीटॉकी, बॅगेज स्कॅनिंग मशिन बसविण्यात येणार आहे़.महापालिका इमारतीची ‘सुरक्षा राम भरोसे’ असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने स्टिंगद्वारे मांडले होते. पिंपरीतील मुख्य इमारतीसह शहरात महापालिकेच्या विविध ठिकाणी मिळकती आहेत. त्यामुळे सुरक्षेविषयी महापालिकेत नगरसेवकांनी आवाज उठविला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणारी बैठक काही दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. त्यामुळे महापालिका मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी ४५० कत्राटी कर्मचारी आणि ३०० आस्थापना कर्मचारी असे एकूण ७५० कर्मचारी सुरक्षा करण्यासाठी तैनात आहेत़ या सर्व कर्मचाऱ्यांचे सकाळी सात ते तीन, तीन ते रात्री दहा आणि रात्री दहा ते सकाळी सात अशा तीन शिफ्टमध्ये काम चालते़ (प्रतिनिधी)पोलिसांकडून चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळत असल्यामुळे अनेक वेळेला महापालिकेवर आलेले मोर्चे, आंदोलने थांबविण्यात महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस यांच्यामुळे मदत होत असल्याची माहिती त्यांनी दिली़ महापालिकेतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी स्थापत्य विभागाकडून मुख्य दरवाजा, तिसरा आणि चौथा मजल्यावर जाळीचे गेट बसविण्यात येणार आहे़ त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार आहे़
सुरक्षा व्यवस्था होणार अद्ययावत
By admin | Published: November 08, 2016 1:37 AM