नारायण बडगुजर- पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप देताना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कमी झाले. मात्र, असे असले तरी महिला अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे तीची सुरक्षा धोक्यात आहे. शहरात वर्षभरात जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक, पळवून नेणे या गुन्ह्यांसह आत्महत्यांचे प्रकार यंदा जास्त घडले. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे गुन्हेही यंदा जास्त आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सरत्या वर्षात सामान्यांच्या सुरक्षेसह पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दाही चिंता वाढविणारा ठरला. .........
वाढती गुन्हेगारी डोकेदुखी ठरत असल्याने पिंपरी-चिंचवड शहर व येथील औद्योगिक परिसरासाठी १५ आॅगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. आयुक्तालयांतर्गत निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी, वाकड, दिघी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी व चिखली हे १५ पोलीस ठाणे आहेत. या ठाण्यांच्याअंतर्गत गुन्हे कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. यात काही अंशी यश आले असले तरी, काही गुन्ह्यांचा आलेख चढताच आहे.
............
भरदिवसा होणाऱ्या खुनाच्या घटनांनी २०१८ मध्ये शहर हादरले होते. खूनप्रकरणी गेल्या वर्षी ६४ तर, यंदा ६२ गुन्हे दाखल करण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्यावर्षी ८२ तर, यंदा ८० गुन्हे दाखल आहेत. सदोष मनुष्यवधाचे गेल्या वर्षी सहा, तर यंदा तीन गुन्हे दाखल आहेत. प्राणांतिक अपघात गेल्या वर्षी ३१० तर, यंदा २८७ झाले. ...............अमली पदार्थांची तस्करी वाढली अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यश आल्याचे दिसून येते. अमली पदार्थ तस्करी, विक्री, बाळगल्याप्रकरणी गेल्या वर्षी १४ तर, यंदा ३७ गुन्हे दाखल आहेत. तसेच बेकायदा पिस्तूल, गावठी कट्टा आदी शस्त्र बाळगण्याचे प्रकार यंदा कमी झाले आहेत. त्यानुसार आर्म अॅक्ट अन्वये गेल्या वर्षी ६९ तर, यंदा ४४ गुन्हे दाखल आहेत. जुगार खेळणाऱ्यांवरील कारवाईत वाढ झाली असून, या प्रकरणी गेल्या वर्षी २३१ तर, यंदा २३६ गुन्हे दाखल आहेत...........अल्पवयीन मुलींच्या पालकांना चिंतापळवून नेल्याचे गेल्या वर्षी ४१२ तर, यंदा ४८९ गुन्हे दाखल झालेत. यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार अधिक आहेत. शाळा, खासगी शिकवणी तसेच इतर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुलींना पळवून नेण्यात येते. त्यामुळे अल्पवयीन मुलींच्या पालकांची चिंता वाढल्याचे दिसून येते. बलात्कारप्रकरणी गेल्या वर्षी १३३ तर, यंदा १५१ गुन्हे दाखल आहेत. विनयभंगप्रकरणी गेल्या वर्षी २९७ तर, यंदा ३९७ गुन्हे दाखल आहेत. यावरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
.......पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल गुन्हेकोणते गुन्हे २०१९ २०१८खून ६२ ६४खुनाचा प्रयत्न ८० ८२सदोष मनुष्यवध ३ ६आत्महत्या ४८ ४०बलात्कार १५१ १३३विनयभंग ३९७ २९७दरोडा २९ ३९जबरी चोरी ३३३ २६०घरफोडी ५१ ४९वाहनचोरी ११९० १३२४फसवणूक ३८८ २९६पळवून नेणे ४८९ ४१२सरकारी हल्ले ४७ ५२प्राणांतिक अपघात २८७ ३१०इतर गुन्हे ७८५ ६६१आर्म अॅक्ट ४४ ६९जुगार २३६ २३१अमली पदार्थ ३७ १४प्रोव्हेबिशन ११०० ५८९कॉपिराईट कायदा ७ १सावकारी अधिनियम २ १