शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

जनतेच्या सेवकांना निवडून द्या : कुरेशी

By admin | Published: February 14, 2017 2:00 AM

जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी समाजवादी पार्टीने महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक २८ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार

रहाटणी : जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी समाजवादी पार्टीने महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक २८ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल भालेराव, नगरसेविका अनिता तापकीर, सविता नखाते, नगरसेवक कैलास थोपटे या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफिकभाई कुरेशी यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. प्रभागाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी चांगल्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन कुरेशी यांनी केले. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महापालिकेत एकहाती सत्ता होती. त्यामुळे विकास करता आला. या शहराला सिंगापूर सिटीचे स्वरूप देण्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे स्वप्न असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्वप्न साकारण्याचे योजिले आहे. त्यांच्या प्रयत्नांना समाजवादी पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. जातीयवादी पक्षांना महापालिकेत सत्ता मिळविण्यापासून रोखण्यासाठी समाजवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठिशी असल्याचे कुरेशी यांनी पत्रात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोरगरिबांची कामे केली आहेत. रहाटणीगाव-काळेवाडी प्रभाग क्रमांक २७ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना कुरेशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रहाटणीगाव- काळेवाडी प्रभाग क्र. २८ मधून विशाल भालेराव, विद्यमान नगरसेविका अनिता तापकीर, सविता नखाते, विद्यमान नगरसेवक कैलास थोपटे हे निवडणूक लढवीत आहेत. विद्यमान नगरसेविका अनिता तापकीर आणि विद्यमान नगरसेवक कैलास थोपटे यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात विविध विकासकामे केली असून, नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या संपूर्ण पॅनलला पुन्हा एकदा नगरसेवकपदाची संधी मिळणार असा विश्वास कुरेशी यांनी व्यक्त केला.या प्रभागाचा नियोजनबद्ध विकास तर झालाच आहे, विकासाला आणखी गती दिली जाईल. अभ्यासू उमेदवार पालिकेत निवडून जाणे गरजेचे असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केले. (वार्ताहर)