शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकतीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 1:59 AM

मृत, तसेच बेपत्ता व्यक्तीची बनावट स्वाक्षरी करून आरोपींनी संगनमताने मिळकत विक्रीचा प्रयत्न केला.

पिंपरी : मृत, तसेच बेपत्ता व्यक्तीची बनावट स्वाक्षरी करून आरोपींनी संगनमताने मिळकत विक्रीचा प्रयत्न केला. फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा राजेश सौदे यांनी फसवणूकप्रकरणी आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. राजकुमार आतरसिंग सौदे (वय ४४, संत तुकारामनगर), निर्मावती आतरसिंग सौदे (वय ६०), ज्योती आतरसिंग सौदे (वय ३३, निगडी), विनोद लोहरीलाल लोघे (वय ३७), संगीता योगेश नागरमोते (वय ४९), योगेश हरिश्चंद्र नागरमोते (वय ४९ ) अशी आरोपींची नावे आहेत.याबाबतची माहिती अशी, आरोपींनी फिर्यादी महिलेची बनावट सही केली. शिवकुमार आतरसिंग सौदे हे २००५ मध्ये बेपत्ता झाले आहेत, तर ६ फेब्रुवारी २०११ला राजेश आतरसिंग सौदे यांचे निधन झाले आहे. असे असताना बेपत्ता आणि मृत व्यक्तीच्या खोट्या सह्या करून आरोपींनी बनावट दस्तऐवज तयार केला. ही मिळकत संगीता नागरमोते यांना विक्रीचा प्रयत्न केला. ही बाब निदर्शनास येताच फिर्यादीने फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.