पिंपरी : बंदोबस्तासाठी एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, २४ पोलीस निरीक्षक, १६५ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २ हजार ४५१ पोलीस कर्मचारी, बूथसाठी १ हजार ६०८ कर्मचारी, १०० मीटरसाठी वेगळे ४६५, मतदान केंद्रातील पाचपेक्षा अधिक बूथवर ५०, सेक्टर पेट्रोलिंगसाठी १३५, वेगवेगळ्या पेट्रोलिंगसाठी १२५ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव दलाचे २०० पोलीस शहरात दाखल झाले आहेत. प्रत्येक संवेदनशील बूथवर एक अधिकारी त्याचबरोबर खास निवडणूक बंदोबस्ताठी एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, २४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तीन हजार कर्मचारी अशी फौज तैनात आहे. झोपडपट्टीनजीकच्या मतदान केंद्रावरील भोसरी, चिंचवड, निगडी, पिंपरी भागातील ६३ बूथवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. पोलीस प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. बंदोबस्तासाठी एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, २४ पोलीस निरीक्षक, १६५ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २ हजार ४५१ पोलीस कर्मचारी, बूथसाठी १ हजार ६०८ कर्मचारी, १०० मीटरसाठी वेगळे ४६५, मतदान केंद्रातील पाचपेक्षा अधिक बूथवर ५०, सेक्टर पेट्रोलिंगसाठी १३५, वेगवेगळ्या पेट्रोलिंगसाठी १२५ कर्मचारी तैनात असतील. (प्रतिनिधी)
संवेदनशील केंद्रात अधिकारी
By admin | Published: February 21, 2017 2:43 AM