शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

Vat Purnima: सात जन्म हीच पत्नी मिळावी; पूरूषांनी सात फेरे मारून केली वटपौर्णिमा साजरी!

By विश्वास मोरे | Published: June 21, 2024 6:33 PM

महिलांनी वटवृक्षाची फांदी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पुजा करावी, पुरुषांचा महिलांना सल्ला

पिंपरी: पिंगळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि  जागृतीच्या वतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते. महिला वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे व सात जन्मी हाच पती परमेश्वर म्हणून मिळावा, म्हणून दीर्घ आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाची पुजा करण्याची प्रथा आहे म्हणून सात जन्म हीच पत्नी मिळावी म्हणून सात फेरे मारले.

 पिंगळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि  जागृतीच्या वतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. विकास कुचेकर म्हणाले की, महिलांनी वटवृक्षाची फांदी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पुजा करावी. पर्यावरणाचा समतोल राखावा पुढील पिढीला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळण्यासाठी वटवृक्षाची लागवड करून जतन करण्याचे त्यांनी आवाहन केले.' 

अरण पवार म्हणाले कि, कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन आभावी आपले प्राण गमवावे लागले ,याचे गांभीर्य ओळखुन वृक्ष लागवड केली पाहिजे, आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी  ऑक्सिजनची सोय आहे. '

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे उपायुक्त मनोज पाटील म्हणाले, की उच्च शिक्षित स्त्री व पुरुषामध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा समानतेच्या जनजागृतीच्या उपक्रमामुळे त्यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल आणि नऊ वर्षापासून पुरुष वटपौर्णिमा आयोजकाचे त्यांनी कौतुक केले.' 

शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले,  की पत्नी व पती यांना समान कायद्याने आधिकार दिले आहेत. पुरूषप्रधान देशात महिला पण पूरूषांच्या खांद्याला खांदा देऊन खुरपणी पासुन ते नासापर्यत प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत.पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महीला पोचल्या आहेत,तरीही त्या पतीला दिर्घ आयुष्य मिळावे म्हणून १५० वर्षे आयुष्य आसणाऱ्या वटवृक्षाला सात फेरे प्रदिक्षणा घालतात मनोभावे पुजा करतात. मग पुरुषांनेही जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी आणि पत्नीला दिर्घ आयुष्य मिळावे व सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाची सात फेरे मारून वटपौर्णिमा साजरी केली तर वावगे ठरू नये.म्हणून आम्हाला सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून आम्ही वटवृक्षाची फेऱ्या मारून सुत घालून,सनई,वाद्य वाजवून मनोभावे पूजा केल्याचे समाधान मिळाले. 

पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड म्हणाल्या, आमच्यासाठी पुरूषांनी सात फेऱ्या मारुन आमच्यासाठी दिर्घ आयुष्य मागीतले यामुळे खूपच आनंद झाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरुष वटपौर्णिमा साजरी केल्याने आम्ही सर्व महीला आनंदी झालोत.

शंकर नानेकर म्हणाले, आजही शासन म्हंणत कि स्त्री पुरुष समान आहेत व शासनाच्याच रोजगार हमी योजने मध्ये स्त्रीला पुरुषापेक्षा कमी रोजगार दिला जातो आणि तसेच संसदेत सुद्धा ३३ टक्के आरक्षण मिळत नाही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढया  संसदेत महिला खासदार आहेत म्हणजेच शासनाचे फक्त बोलायचे एक आणि करायचे असं सरकारच काम चालू आहे असं मला वाटतं.' वृक्ष मित्र अरुण पवार यांनी पर्यावरण संरक्षण आणि सर्वधनाची ,व प्लास्टिक न  वापण्याची शपथ नागरिकांना देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाmarriageलग्नSocialसामाजिकenvironmentपर्यावरणHealthआरोग्य