पिंपरी : पॉर्न व्हिडीओ दाखवून पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीर संबंध केले. लैंगिक अत्याचार तसेच मारहाण करून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. देवळाली कॅम्प, नाशिक येथे २८ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. पीडित विवाहितेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. ७) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिचा पती, दीर, सासू व नणंद यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला काळी बुटकी बोलून तसेच लग्नात सोने कमी दिले म्हणून आरोपींनी शिवीगाळ केली. आरोपी सासू व नणंद यांनी फिर्यादीच्या डोक्याचे केस ओढले व मारहाण केली. हुंड्याची मागणी करून आरोपींनी फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. फिर्यादीच्या पतीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध पॉर्न व्हिडीओ दाखवून फिर्यादीशी अनैसर्गिक शरीर संबंध केले, असे फिर्यादीत नमूद आहे.