पुणे : पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक लढवण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. परंतु ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंदकांत पाटील, बाळासाहेंबाची शिवसेनेेचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या उपस्थितीत हेमंत रासने आणि अश्विनी जगताप उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीकडे विनंती केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ''कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणूक पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट अशा सर्व पक्षांकडे विनंती केलेली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत मदत करावी.''
कसबा आणि चिंचवड बिनविरोध होण्यासाठी भाजपच्या वतीने सर्वपासक्षीयांना पत्र पाठवून विनंती करण्यात आली होती. परंतु महाविकास आघाडी निडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे दिसून आले. तसेच राज ठाकरे यांनी पत्राद्वारे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती केली होती.