शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

कर्जबाजारीपणामुळे चिंचवडचे शिंदे कुटुंबीय गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 12:11 AM

अडीच कोटींचे कर्ज : घरी सुसाईड नोट

पिंपरी : कर्जबाजारीपणाला कंटाळून मोहननगर येथून शिंदे कुटुंबातील चार जण बेपत्ता झाले आहेत. कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून ठेवून संतोष शिंदे हे पत्नी व दोन मुलांसह घराबाहेर पडले. जाण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली असल्याने खळबळ उडाली आहे. ५ डिसेंबरपासून बेपत्ता झालेल्या शिंदे कुटुंबातील कोणाशीही संपर्क होत नसल्याने त्यांच्या बंधूने पिंपरी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात असलेल्या संतोष शिंदे यांनी पत्नी सविता, मुलगा मुकुंद आणि मुलगी मैथिली यांच्यासह मोहननगर येथील घर सोडले. घरातून निघून गेलेल्या शिंदे कुटुंबातील चौघांचा १५ दिवस झाले थांगपत्ता लागलेला नाही. शिंदे यांच्यासह त्यांचा २१ वर्षांचा मुलगा मुकुंद, १६ वर्षांची मुलगी मैथली हेसुद्धा घरातून बाहेर निघून गेले आहेत. शिंदे कुटुंबीय चिंचवड मोहननगरमधील रहिवासी आहेत. गणपती मंदिर, कराळे चाळ या परिसरात त्यांचे घर आहे. घराच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. शिंदे यांचा पिंपरीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून तसेच वारंवार खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. दोन कोटींहून अधिक कर्ज झाले.व्यवसायासाठी तसेच घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते मागील काही महिन्यांपासून थकले होते. या कर्जवसुलीसाठी बँकांनी तगादा लावला होता. खासगी सावकारांचा ससेमिरा मागे लागला होता.बँकेने मालमत्ता जप्तीची नोटीसही दिली होती.४कर्जाच्या विळख्यात अडकल्याने शिंदे कुटुंबीय बेजार झाले होते. बँकेकडून मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ शकते. या भीतीने शिंदे कुटुंबीय विंवचनेत होते. बँकेची कारवाई टाळण्यासाठी शिंदे कुटुंबीय सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाले आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.सुसाईड नोट व मोबाइल मिळाला४कर्जबाजारीपणाला मी एकटाच जबाबदार आहे. इतर कोणाला दोषी धरू नये. मी स्वत: घर सोडून निघून जात आहे. आम्ही चौघेही आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत आहोत, हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे, असे सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवले आहे. संतोष यांच्या भावाने कुटुंबातील सदस्यांशी संपर्क होत नसल्याने ६ डिसेंबरला पोलिसांना याबाबत माहिती दिली. कोणीही मोबाइलवर उपलब्ध होत नाही, म्हणून सर्वत्र शोधाशोध केली, त्या वेळी चौघांचे मोबाइल आणि सुसाईड नोट घरात आढळून आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड