शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

उद्योगनगरी झाली बंदुकीचे शहर, गावठी कट्टे, परदेशी बनावटीच्या पिस्तुलांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 3:49 AM

शहरात घरफोडी, भुरट्या चोऱ्या आणि हाणामारी अशा छोट्या-मोठ्या गुन्ह्यातही पिस्तूल वापरात येत आहे. शहरातील गुन्हेगारांचे पिस्तूल वापराचे प्रमाण वाढले आहे. बेकायदा शस्त्र बाळगणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तरच पिस्तूल बाळगणाºयांची काही प्रमाणात आकडेवारी मिळते.

पिंपरी - शहरात घरफोडी, भुरट्या चोऱ्या आणि हाणामारी अशा छोट्या-मोठ्या गुन्ह्यातही पिस्तूल वापरात येत आहे. शहरातील गुन्हेगारांचे पिस्तूल वापराचे प्रमाण वाढले आहे. बेकायदा शस्त्र बाळगणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तरच पिस्तूल बाळगणाºयांची काही प्रमाणात आकडेवारी मिळते. बेकायदा पिस्तूल बाळगणाºयांचे रेकॉर्ड उपलब्ध नसले, तरी घडणाºया घटनांच्या माध्यमातून हे बंदुकीचे शहर असल्याची प्रचिती येत आहे. पिस्तूलविक्रीच्या रॅकेटचे परराज्याशी कनेक्शन असल्याचे यापूर्वीच पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडीत गोळीबाराची घटना घडल्याने पिस्तूल वापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.दोन वर्षांत परिमंडल तीनच्या हद्दीत भोसरी, निगडी, पिंपरी, चिंचवड, वाकड, सांगवी, तसेच हिंजवडी आदी ठिकाणी पिस्तूल बाळगणारे आरोपी वारंवार आढळून आले आहेत. चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्यांकडे पिस्तूल, जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. रस्त्यावर वाहनांची प्रतीक्षा करणारे, तसेच निर्जन ठिकाणाहून जाणारे यांना रस्त्यात अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडण्याच्या घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यांत आहे. बेकायदा पिस्तूल बाळगणाºयांना एकदा पकडले जाते. बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल होतो. जामिनावर सुटल्यानंतर हे आरोपी पुन्हा शस्त्र खरेदी करतात. पिस्तूलविक्रीच्या या छुप्या बाजारपेठेची त्यांना चांगलीच माहिती असते. पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केले, तरी ते आणखी पिस्तूल मिळवितात.वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे २० मार्चला गोळीबाराची घटना घडली. त्यातील जखमीने फिर्याद देण्याचे टाळले. लोखंडी सळईने जखम झाली असे सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनीच गोळीबार झाल्याची फिर्याद दाखल केली.काळभोरनगरमध्ये स्थानिक गुंडांच्या वर्चस्व वादातून एकाचा खून झाला. सोन्या काळभोर आणि महाकाली गॅँगचा सदस्य अनिकेत जाधव यांच्यात झालेल्या चकमकीत जाधव मारला गेला. तो २४ तास दोन पिस्तूल बाळगून असे. पोलिसांनी ते पकडले, जप्त केले, तरी त्याच्याकडे आणखी पिस्तूल उपलब्ध होत असे. पिस्तूल जप्त तरी किती करायची, असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित होत असे. गोळीबार करताना चुकून पिस्तूल खाली पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सराइतासह अगदी अल्पवयीन गुन्हेगारांकडेसुद्धा पिस्तूल आढळून येत आहे. वाढदिवसाला हवेत गोळीबार करण्याच्या घटना शहरात या आधी घडलेल्या आहेत. आता तर वाढदिवस साजरा करताना, तलवारने केक कापण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे शहर धोक्याच्या वळणावर आहे.परदेशी बनावटीचे पिस्तूलगुन्हे शाखा युनिट चारच्या कारवाईत चंदन सुरेंद्र सिंग हा बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे जाळ्यात अडकला. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता. परदेशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगलेल्या मुकेश ओमप्रकाश मंगोत्रा याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला पिस्तूल, तसेच जिवंत काडतुसे या मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. चेतन विश्वकर्मा याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी विश्वकर्मा याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. गुंडा स्कॉडच्या पथकाने सापळा रचून मुकेश मंगोत्रा याला पिस्तूल विक्रीस आला असता ताब्यात घेतले होते.पिस्तूल २५ तर कट्टा १२ हजारांतगुंडांना त्यांच्या रॅकेटमधून अवघ्या २५ हजार रुपयांत पिस्तूल मिळते. गावठी कट्टा तर अवघ्या १२ हजार रुपयांत मिळतो. देशी, परदेशी बनावटीच्या पिस्तूलसह गावठी कट्टे सहज उपलब्ध होत असल्याने चाकू, सुºयाने मारामारी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी नंग्या तलवारी, कोयते घेऊन टोळक्यांचा वावर दिसून येतो. परंतु खून, धमकावणे आणि खंडणी वसुलीच्या प्रकरणात राजरोसपणे पिस्तुलाचा वापर केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढली असल्याने शहरातील पिस्तुलाची बाजारपेठही वाढली आहे.विक्रीचे परप्रांतीयांशी रॅकेटकधी खंडणीविरोधी पथकाला, तर कधी स्थानिक पोलिसांना गस्तीवर असताना पिस्तूल, गावठी कट्टे विक्री करणारे आढळून येत आहेत. परराज्यांतून गावठी कट्टे, पिस्तूल राजरोसपणे शहरात आणून विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.उत्तर प्रदेशातून येणारे पिस्तूल शहरात राजरोसपणे विक्री होत आहेत.उत्तर प्रदेशातून पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला खंडणीविरोधी पथकाने मोशी, बोºहाडेवस्ती येथे पकडले. त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला. महंमद मोईन समीम उद्दीन ऊर्फ बाबू खान असे त्या आरोपीचे नाव होते. महंमद हा मूळचा उत्तर प्रदेश येथील (ग्राम गंदियानी, तालुका सौराव, जिल्हा अलाहाबाद) येथील रहिवासी आहे. तो आदर्शनगर, मोशी येथे वास्तव्यास होता. त्याच्याकडून पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड