शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मावळ, शिरूर लोकसभेवरून शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने शिंदे गटाला ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 9:39 AM

पिंपरी विधानसभेसाठी अण्णा बनसोडे यांना गळ...

- हणमंत पाटील

पिंपरी :पुणे जिल्ह्यातील चार लोकसभांपैकी प्रत्येकी दोन मतदासंघांचे वाटप भाजप - शिवसेनेत युतीपासूनचे आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता भाजपने मित्र पक्षाकडील शिरूर व मावळ या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर, तसेच पिंपरी विधनसभेवरही दावा केला आहे. त्यामुळे युतीत धुसफूस सुरू झाली आहे. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानाही भाजपकडून पुणे जिल्ह्यात युतीचा धर्म पाळला जात नाही, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

युतीच्या स्थापनेपासून पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांचे शिवसेना-भाजपमध्ये समान वाटप झाले आहे. त्यामध्ये पुणे व बारामती लोकसभा भाजपकडे, तसेच शिरूर व मावळ हे शिवसेनेकडे अनेक वर्षांपासून आहेत. मात्र, शतप्रतिशत भाजपची घोषणा आणि फुटीनंतर शिवसेनेची ताकत कमी झाली. पार्श्वभूमीवर भाजप आता शिवसेनेच्या मावळ व शिरूर दोन्ही मतदारसंघावर दावा करू लागली आहे. या दोन्ही मतदार संघात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी भाजपने आमदार महेश लांडगे (शिरूर) व माजीमंत्री बाळा भेगडे (मावळ) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच दोघांनीही पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढण्याची तयारी दाखविली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटातील मावळचे खासदार श्रीरंग बारणे व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अस्वस्थ झाले होते.

या पार्श्भूमीवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच पिंपरी चिंचवड दौरा करून शिवसेनेच्या आजी - माजी खासदार यांना ताकद दिली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या मतदासंघात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम घेऊन दोन्ही लोकसभेवरील शिवसेनेचा दावा कायम असल्याचा अप्रत्यक्ष संदेश भाजपला दिला आहे. 

पिंपरी विधानसभेसाठी अण्णा बनसोडे यांना गळ... पुणे शहरातील युतीतील आठही विधानसभा मतदार संघ भाजपने खचून घेतले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघात भाजपने तयारी केली आहे. त्यापैकी पिंपरी हा राखीव मतदार संघ शिवसेनेकडे आहे. पण, ही जागा गतपंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने जिंकली. त्यामुळे भाजपचे अमित गोरखे यांनी या मतदासंघात तयारी केली आहे. या मतदासंघावरील शिवसेनेचा दावा कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच भेट घेतली. तसेच त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील लोकसभांची सद्यस्थिती

मतदार संघ-  खासदार-  पक्ष 

१) पुणे- दिवंगत गिरीश बापट- भाजप२)  बारामती- सुप्रिया सुळे- राष्ट्रवादी३) शिरूर- डॉ. अमोल कोल्हे- राष्ट्रवादी ४)मावळ- श्रीरंग बारणे- शिवसेना 

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभा