निगडी : घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेच्या विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन व जनजागरण करण्यासाठी शहरात दि. ११ ते १७ जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम राबविले जातात. विद्युत नियमांचे पालन व्हावे, तसेच घरगुती किंवा सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सतर्क व सावधगिरी बाळगण्याबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. मात्र विद्युत सप्ताहाच्याच काळात विद्युत महावितरणाचे कर्मचारी कोणत्याही सुरक्षेच्या साधनांचा वापर न करता धोकादायकरीत्या विद्युत खांबावर चढून काम करीत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. विद्युत सुरक्षा सप्ताहाच्याच काळात महावितरण अधिकाऱ्यासमोर कर्मचारी सुरक्षा नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात विद्युत निरीक्षक विभाग, अग्निशामक दल, वीज वितरण महामंडळ सुरक्षिततेविषयी कामगार वर्गात जनजागृती करत असताना महावितरण कर्मचाऱ्यांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होते. (वार्ताहर)
सुरक्षा सप्ताहाला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून झटका
By admin | Published: January 14, 2017 2:49 AM