पिंपरी : कंपनीचा इमेल आयडी हॅक करून कंपनीविषयक बदनामीकारक मजकूर लिहून ग्राहकांना पाठविला. तसेच कंपनीतील व कंपनी सोडून गेलेले असे ११५० कामगारांचा मृत्यू झाला असून ते पीएम अकाउंटमधून बाहेर पडत असल्याबाबत चुकीची माहिती दर्शवली. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वडमुखवाडी येथे २० व २५ एप्रिल रोजी ही घटना घडली.
कुमार भरत लोमटे (वय ३४, रा. आळंदी रोड, वडमुखवाडी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची वडमुखवाडी येथे एसआयएस फॅसिलिटी इंडिया प्रा. लि. ही कंपनी आहे. आरोपीन या कंपनीचा तसेच श्रीविनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीचा इमेल आयडी हॅक केला. फिर्यादीच्या कंपनीशी संबंधित असलेल्या ग्राहकांना त्यांच्या व कंपनीविषयी बदनामीकारक मजकूर लिहून पाठविला. तसेच पीएम साईटवर जाऊन एसआयएस फॅसिलिटी इंडिया प्रा. लि. कंपनीचा पीएफ इसॅब्लीशमेंट कोड व श्री विनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस कंपनीचा पीएफ इसॅंब्लीशमेंट कोड यावर कंपनीतील व कंपनी सोडून गेलेल अशा ११५० कामगारांचा मृत्यू झाला असून, ते पीएफ अकाउंटमधून बाहेर पडत असल्याबाबत चुकीची माहिती दर्शविली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे तपास करीत आहेत.