- प्रकाश गायकरपिंपरी : शहराचे तापमान ३८ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. अशा कडक उन्हात वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांची दमछाक होते. त्यांना अक्षरश: उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस उभे असतात. परंतु उन्हाळ््यामध्ये भर उन्हात उभे राहूनच पोलिसांना काम करावे लागते. सगळ्याच चौकांत उन्हातच उभे राहून कर्तव्य करावे लागते. उभे राहण्यासाठी साधी बूथचीही सोय प्रशासनाकडून करण्यात येत नाही.प्रशासन गेल्या दोन वर्षांपासून चौकांमध्ये व वर्दळीच्या ठिकाणी बूथ उभे करण्याच्या विचाराधीन आहे. परंतु अद्याप प्रत्यक्षात काही बूथ उभे राहिले नाहीत. त्यामुळे खाली रस्तातापला असताना आणि वरून उन्हाच्या झळा लागत असताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसते.वाहतूक पोलीस भर उन्हात जबाबदारी पार पाडत असताना प्रशासन मात्र त्यांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करीत आहे. कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बूथ उभारण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे बंदोबस्तावरील पोलिसांनाही या समस्यांचा सामना करावा लागतो.शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी वाहतूक पोलीस तापलेल्या रस्त्यावर उभे राहून जबाबदारी पार पाडत असतात; मात्र सोयी-सुविधांअभावी त्यांची प्रचंड गैरसोय होते. उन्हाळ्यात किमान सावलीची तरी सोय व्हावी, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांकडून बाळगली जात आहे.पोलिसांना बारा तास ड्युटी करावी लागते. त्यातील सकाळी ९ ते २ या भर उन्हाच्या काळात उन्हाच्या झळा अंगावर घेत ड्युटी करावी लागत असल्याने उन्हाचा चांगलाच चटका त्यांना बसतो. बºयाचशा चौकांमध्ये महिला पोलीसही भर उन्हातच वाहतुकीचे नियमन करताना दिसतात. बहुतेक पोलिसांना थकवा जाणवणे, भूक न लागणे, चक्कर येणे असे त्रास होतात. अनेक पोलिसांना वाढत्या उन्हाच्या त्रासामुळे नेत्ररोगासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. डोळे लाल होणे, सतत पाणी येणे, डोळ्यांची आग होणे असा त्रास होतो. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते.पिंपरी चौकाजवळील लोखंडे कामगार भवन येथील वाहतूक नियंत्रण कक्षात पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. तेथे कार्यरत कर्मचाºयांना स्वखर्चाने पाण्याच्याबाटल्या विकत घ्याव्या लागतात. तीन वर्षांत बºयाचदा अर्ज देऊनही पिण्याच्या पाण्याची सोय अद्यापही महापालिकेने करून दिलेली नाही.बंदोबस्ताच्या वेळी उन्हातच बारा तास उभे राहून कर्तव्य पार पाडावे लागत असल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. उन्हापासून बचाव करण्याची उपाययोजनाच नसल्याने त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक पोलिसांना झळा; चौकांत बूथची नाही व्यवस्था, आरोग्यावर होतोय परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 4:29 AM