पिंपरी :
आलीस तू अशी ही, लेवून सांजधारामन मोरपीस झाले, होऊ नकोस वारातू थांब ना जराशी, उधळून पिसाराहे मेघ शुभ्र व्हावे, बरसून रंग धारा!!श्रावण आणि प्रेम म्हणजे इंद्रधनुषी रंगांत मोरपिसाचा स्पर्श व्हावा आणि प्रेमाला बहर यावा. त्याचं आणि तिचं नातं बहरून यावं, मोहरून यावं!आजकाल या नात्याला बहरून येण्यासाठी अधिक वेळ लागत नाही. इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे प्रेम जरा जास्तच जवळ आलं आहे. फक्त प्रेमच नाही, तर इतरही गोष्टी सोप्या आणि सुटसुटीत झाल्या आहेत.पण गंमत अशी आहे, की या इंटरनेटच्या युगात प्रत्यक्ष भेटीवर आणि पारंपरिक पद्धतीने घडून आलेल्या योगायोगावर विश्वास ठेवणारासुद्धा एक तरुणवर्ग आहे. इंटरनेट आणि पारंपरिक प्रेम यातील गंमत व तफावत कलर्स चॅनलच्या आगामी मालिाकेमध्ये बघायला मिळणार आहे; ज्याचे नाव आहे ‘इंटरनेटवाला लव्ह.’याच आगळ्यावेगळ्या प्रेमाचा धागा घेऊन श्रावण महिन्यातला हा श्रावण सखी महोत्सव कलर्स व सखी मंच प्रस्तुत, अनलिमिटेड द फॅमिली फॅशन स्टोअरच्या, फुगेवाडी सहयोगाने सुबक आणि सुरेख पद्धतीने गुंफला आहे - ज्यात आहेत विविध स्पर्धा, खेळ, मनोरंजन आणि भरपूर काही.सखींसाठी खास फॅशन वॉकयामध्ये आधुनिक वेशभूषेसह तिला रॅम्पवर उतरायचे आहे आणि ‘इंटरनेटवाला लव्ह’वर तिचे मत मांडायचे आहे. ज्यामध्ये काही प्रश्नसुद्धा विचारले जातील.स्त्रियांची आवडती उखाणे स्पर्धाआणखी विशेष आकर्षण म्हणजे एक मिनिट गेम शोमध्ये पारंपरिक पद्धतीने खेळ खेळविले जातील. ज्यात फुगडी, लिंबू-चमचा असे खेळ असतील. विशेष कॉमेडी शोचे सुद्धा आयोजन केले जाईल. वंदन राम नगरकर स्टॅण्डअप कॉमेडी शो सादर करणार आहेत. एकूणच मनोरंजनाने भरगच्च असा हा कार्यक्रम राहणार आहे. ‘इंटरनेटवाला लव्ह’ हा पारंपरिक पद्धतीने घडून आलेला लग्नसोहळा यावर बरीच रंगतदार चर्चा या निमित्ताने होणार आहे. २७ आॅगस्टपासून संध्याकाळी ७ वाजता सोमवार ते शुक्रवार या दरम्यान ही मालिका प्रसारित होणार आहे. कार्यक्रम सर्व सखींसाठी नि:शुल्क असून, सहभागी होण्यासाठी ९०२८३६२५०९, ९८८१६७०१५४ या नंबरवर संपर्क साधावा. कार्यक्रमाचे व्हेन्यू स्पॉन्सरर ढोरे लॉन्स (अनुश्री हर्षल ढोरे) असून, वन मिनिट गेम शोचे गिफ्ट स्पॉन्सरर कावेडिया ज्वेलर्स (जुनी सांगवी) आहेत.४उखाणा स्पर्धेमध्ये एकच उखाणा सादर करावा.४स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रथम नावनोंदणी करणे आवश्यक.४फ्युजन फॅशन शोसाठी आधुनिक आणि पारंपरिक वेशभूषा करावी.उदा. छत्रीसह पैठणी, गॉगल, नऊवारी इ.४‘प्रेम’ या शब्दाचा वापर करून उखाणा घ्यावा.४उपस्थित सखींनी हिरवी साडी वा ड्रेस आणि नथ परिधान करावी.४आकर्षक वेशभूषेतील सखींना बक्षीस जिंकण्याची संधी.४या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक सखीस अनलिमिटेड द फॅमिली फॅशन स्टोअरतर्फे, फुगेवाडी हमखास गिफ्ट व्हाउचर देण्यात येईल.४अनलिमिटेड द फॅमिली फॅशन स्टोअरमधील नवनवीन वेशभूषेमध्ये सखींना रॅम्प वॉक करण्याची संधी मिळणार आहे.४लेटिस्ट अॅट्यूम विंटर २०१८ ची नवीन रेंज आपल्या सखीमंचच्या सहभागी सभासदांना अनुभवता येईल. ‘अनलिमिटेड’ हा ब्रँड पुरुष, स्त्रिया व लहान मुलांकरिता २०००० पेक्षा जास्त व्हरायटी सादर करत आहे. याचीच एक झलक म्हणून सखी मंच सभासद अनलिमिटेड द फॅमिली फॅशन स्टोअर (फुगेवाडी) वस्त्र परिधान करून फॅशन वॉक करताना पहायला मिळेल.कार्यक्रमाची वेळ : दुपारी १२स्थळ : बालाजी लॉन, ढोरेनगर, लेन नं. १, नदी किनारा, जुनी सांगवी