पिंपरी: बैलगाडीतुन मिरवणूक, ढोलताशा आणि घोषणांच्या गजरात रॅली, अशा जोरदार शक्तिप्रदर्शनासह शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला आहेत. दरम्यान आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढली. या शक्तिप्रदर्शन रॅलीची सुरुवात आकुर्डी येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने झाली.खासदार बारणे यांनी रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आकुर्डी येथील श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर रॅली सुरू झाली. ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू झाली. बैलगाडीतुन मिरवणूक निघाली आहे. यावेळी महायुतीच्या घटकपक्षातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थिती दाखवली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना नेते अनिल देसाई, पालकमंत्री गिरीश बापट,खासदार अमर साबळे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, उपनेत्या नीलम गोऱ्हे, आमदार शरद सोनवणे, गटनेते राहुल कलाटे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, बाळा भेगडे, मनोहर भोईर, अमित गोरखे, चंद्रकांत सोनकांबळे,प्रशांत ठाकूर, आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेना भाजप उमेदवार श्रीरंग बारणे यांची भेट मावळ लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे श्रीरंग बारणे व राष्ट्रवादीचे पार्थ पवार समोरासमोर आले असता एकमेकांना शभेच्छा दिल्या.