लोकमत न्यूज नेटवर्कमहाळुंगे : चाकण तळेगाव रस्त्यावरील महाळुंगे येथे राज्य महामार्गावरील बाजूपट्टी उकरून एक महिना झाला तरी बुजवली नाही. महाळुंगे गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत ही बाजूपट्टी आहे. यामुळे गावात येणाऱ्या व्यक्तींची चूक-भूल होत आहे. यामुळे एखादी गंभीर स्वरूपाची घटना घडू शकते. लवकरात लवकर ही बाजूपट्टी बुजवावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थ करीत आहेत.चाकण-तळेगाव रस्त्यावर नेहमीची गर्दी असते. हा रस्ता वर्दळीचा आहे. या ठिकाणी मुख्य औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या हजारोंनी आहे आणि त्यात ही बाजूपट्टी उकरल्याने महाळुंगेकर ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सारखी ट्रॅफिक होत आहे. गावात जातानाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पादचारी दुचाकीस्वार यांनाही आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.गावकारभाऱ्यांना विचारले असता, ते म्हणतात, आम्हाला यातले काही माहीत नाही. आमच्याकडे कसलीही परवानगी कोणी मागितली नाही. मग हा रस्ता उकरलाच कसा, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आह. गावचा विकास करताना हे गाव चालक झोपले आहेत का, असेही नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. संबंधित अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये विचारा असे सांगतात. या रस्त्याला कोणी वाली आहे का? वारंवार उकरल्यामुळे रस्त्याच्या बाजूपट्ट्या खचत चालल्या आहेत. पावसाळ्यात यामुळे भीषण स्वरूपाची दुर्घटना घडू शकते.बाजूपट्टी खोडल्यानंतर त्यावर कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे बाजूपट्टीवर खड्डे पडतात. तसेच खडी, दगड तशाच वरच्यावर राहतात. त्यामुळे प्रवासी व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्ता आधीच प्रवासासाठी अपुरा पडत आहे. त्यामध्ये या बाजूपट्ट्या खोदल्या आहेत. यामुळे हा रस्ता सायंकाळी व सकाळी जाम होतो. पोलिसांना हा रस्ता मोकळा करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. खोदलेली बाजूपट्टी लवकरात लवकर दुरुस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे, यामुळे होणारा अनर्थ टळेल.
तळेगाव रस्त्यावर साइडपट्ट्यांचा धोका
By admin | Published: May 24, 2017 3:56 AM