मंगेश पांडेपिंपरी : मद्यपान करून वाहन चालविणा-यांना लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘ब्रीथ अॅनालयझर’ या यंत्राद्वारे तपासणी केली जाते. मात्र, एकच यंत्र अनेकांच्या तोंडाला लावले जात असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संसर्गजन्य आजार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याकडे फारशा गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.कायद्याने गुन्हा असतानाही अनेकजण मद्यपान करून वाहन चालवीत असतात. त्यामुळे अपघाताच्याही घटना घडतात. वेळोवेळी मद्यपी चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. कारवाईवेळी पोलिसांकडून ‘ब्रीथ अॅनालायझर’ यंत्राद्वारे तपासणी केली जाते. यामध्ये चालकाच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण कळते. ठरावीक टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण आढळल्यास दंड वसूल केला जातो.संसर्गाची भीतीया यंत्राचे जे स्ट्रॉ वाहनचालकाच्या तोंडाला लावले जातात. ते बदलणे गरजेचे आहे. मात्र, एकच स्ट्रॉ अनेकांच्या तोंडात लावला जातो. त्यामुळे मौखिक आजाराचा प्रादूर्भाव होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या आजाराबाबत माहिती नसते. अशा परिस्थितीत एकाच यंत्राने सरसकट अनेकांची तपासणी केल्यास ते धोकादायक ठरू शकते. टीबीसह अन्य संसर्गजन्य आजारांची भीती असते. याबाबत प्रशासनानेखबरदारी घेण्याची गरज निर्माणझाली आहे.दरम्यान, ब्रीथ अॅनालायझरद्वारे तपासणी करत असताना या यंत्राचा पुढील स्ट्रॉ संबंधित वाहनचालकाच्या तोंडात टाकला जातो. यानंतर चालकास फुंक मारण्यास सांगितले जाते. यंत्रावरील काटा ज्या प्रमाणात फिरेल त्यानुसार अल्कोहोलचे प्रमाण ठरते. एकच यंत्र अनेकांसाठी वापरले जाते. एखाद्या व्यक्तीस आजार असल्यास त्यापासून इतर वाहनचालकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
एकच ब्रीथ अॅनालयझर : वाहनचालकांच्या आरोग्याशी होतोय खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 5:24 AM