शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सहा विशेष पथके : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 11:01 AM

गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याना पोलिसी खाक्या दाखविणार तसेच गुन्हेगारांना कायद्यानुसार सुधारण्याची संधी दिली जाईल.

ठळक मुद्देनागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक

नारायण बडगुजरपिंपरी : शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आयर्नमॅन, अल्ट्रामॅन कृष्ण प्रकाश यांनी गेल्या आठवड्यात पदभार स्वीकारला असून, गुन्हेगारी व त्याचे स्वरूप आदीबाबत ते आढावा घेत आहेत. डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानुसार त्यांनी कामाचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी प्रश्नोत्तर स्वरुपात साधलेला संवाद...

प्रश्न : पिंपरी-चिंचवड हे नवनिर्मित शहर असून, येथे सराईतांच्या तुलनेत नवे गुन्हेगार समोर येत आहेत. त्याबाबत काय सांगाल?उत्तर : अल्पावधीत नावारुपास आलेले देशातील हे औद्योगिक शहर आहे. आयटीपार्क, एमआयडीसीतील कर्मचारी व कामगार तसेच माथाडी कामगार येथे मोठ्या प्रमाणात आहेत. यात स्थलांतरीतांचा मोठा भरणा आहे. यात परदेशी नागरिकही आहेत. स्थलांतरामुळे अनेक समस्या निर्माण होतात. तसेच इतर राज्यातील गुन्हेगार येथे आश्रयाला येतात. परिणामी येथील गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येते.  

प्रश्न : अवैध धंदे नाहीत, गुन्हेगारी नियंत्रणात आहे, असे सांगण्यात येते. मात्र तसे नाही. शहरातील गुन्हेगारी कोणत्या स्वरुपाची आहे, असे वाटते?उत्तर : काही लोक सांगतात शहरात गुन्हेगारी वगैरे काही नाही. मात्र शहरात गुन्हेगारी आहे. २६ गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. जमिनींवरील अतिक्रमणाचे गुन्हे, माथाडीच्या नावाखाली धमकावणे, संघटित स्वरुपाचे गुन्हे येथे दिसून येतात. काही गटतट देखील आहेत. त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो. 

प्रश्न : असे गुन्हेगार, गटतटापासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी काय उपाययोजना करणार?उत्तर : नागरिकांनी बिनदिक्कत पोलिसांची मदत घ्यावी. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी एक मध्यवर्ती पथक नियुक्त केले जाईल. तसेच प्रत्यक्ष मदतीसाठी पाच ते सहा पथके स्थापन केली जातील. हेल्पलाइनची जबाबदारी असलेल्या मध्यवर्ती पथकाकडून त्या पथकांना सूचना केली जाईल. 

प्रश्न : गुन्हेगारी रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार?उत्तर : सध्या येथील माणसे समजून घेऊन गुन्हेगारीचा आढावा घेत आहे. विविध पथके स्थापन करण्याचे नियोजन असून, मूर्त स्वरुपात येण्यास पुरेसा वेळ द्यावा लागेल. त्यानंतर अंमलबजावणी होईल. गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याना पोलिसी खाक्या दाखविणार. गुन्हेगारांना कायद्यानुसार सुधारण्याची संधी दिली जाईल. त्यासाठी विविध उपक्रम देखील राबविण्यात येतील. 

प्रश्न : लॉकडाऊन शिथील होताच वाहनचोरीचे प्रकार वाढल्याचे दिसून येते. त्यातील मास्टरमार्इंडला पकडण्यात यश का येत नाही?उत्तर : वाहनचोरीच्या काही गुन्ह्यांची उकल होत आहे. यात आंतराराज्य टोळी आहे का, किती टोळ्या सक्रिय आहेत, याचा आढावा घेतला जात आहे. तसेच आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडे त्याबाबत चौकशी केली जात आहे. मुळाशी जाऊन तपास करण्यासाठी वाहन चोरी प्रतिबंधक पथक नियुक्त केले जाईल. 

प्रश्न : कोरोनाच्या काळात पोलिसांच्या फिटनेससाठी काय उपक्रम राबविणार?उत्तर : आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार तज्ज्ञांकडून योगासने तसेच व्यायामाबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देणार. पट्रोलिंगसाठी सायकलच्या वापरावर भर देणार. त्यासाठी सायकलिंग व रनिंग करण्याबाबत सूचित केले जाईल. त्यावर ‘स्मार्ट’ पद्धतीने नजर ठेवली जाईल. ‘स्मार्ट वॉच’सारखे ‘फिटबिट’ हे फिटनेस ट्रेकर पोलिसांना दिले जाईल. त्यामुळे पोलिसांची आॅक्सिजन पातळी, मधुमेह, कॅलरीज, शरीराचे तापमान आदी बाबींची नोंद होईल. 

प्रश्न : फिटनेस ट्रेकर ‘फिटबिट’चा फायदा काय होईल?उत्तर : पोलिसांनी फिटबिट मनगटी घड्याळासारखे वापरायचे आहे. प्रत्येक फिटबिट आयुक्तालयातील डॅशबोर्डला कनेक्ट राहणार आहे. त्यामुळे पोलिसांचे शरीराचे तापमान, नाडीचे ठोके, कॅलरीज, मधुमेह, आॅक्सिजन पातळी याची माहिती डॅशबोर्डवरून मिळणार आहे. परिणामी कोणत्या पोलिसाला आरामाची गरज आहे, काय त्रास आहे, याची इत्यंभूत माहिती उपलब्ध होईल. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, मार्गदर्शन करणे सोपे होईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्त