शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

नेत्यांचे बोटचेपे धोरण महाविकास आघाडीच्या अपयशास कारणीभूत

By विश्वास मोरे | Published: March 06, 2023 1:24 PM

विभागलेली ताकद, एकजूट आणि महाविकास आघाडीची मोट बांधण्याची गरज आहे.  

विश्वास मोरे, पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील नेत्यांची गटबाजी आणि पक्षातील नेत्यांचे बोटचेपे धोरण यामुळे पुन्हा चौथ्यांदा अपयश आले. चिंचवड विधानसभेत गेल्या तीन लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमधील पक्षांना मिळणाºया मतांची टक्केवारी पाहता एकजूट नसल्याचा आणि गावकी भावकीचा फटका पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता महाविकास आघाडीला बसला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महविकास आघाडीतील दोघांचे भांडण आणि तिसºयाचा लाभ ही परंपरा कायम आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपली पकड घट्ट करण्याची गरज आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाची पुर्नरचना झाल्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघ तयार झाला. मावळ लोकसभा मतदार संघात चिंचवड विधानसभा मतदार संघाचा समोवश आहे. २००९, २०१४, २०१९ या तिनही लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पक्षीय मतविभागणीचा फायदा कधी अपक्ष बंडखोराने, तर कधी भाजपाने उचलला आहे. ताकद असतानाही अजितदादांची दादागिरी कमी पडल्याचे दिसून येत आहे.बंडाळी रोखण्यात अपयश

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राजकारण असो की लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतील बंडाळी रोखण्यात आजपर्यंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना अपयश आले आहे. २००९ च्या निवडणूकीत काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी दिली. असे असताना राष्टÑवादीच्या महापौर, नगरसेवकांनी अपक्ष लक्ष्मण जगताप यांचा प्रचार केला होता. राष्ट्रवादीतील माजी स्थायी समिती सभापती विलास नांदगुडे यांनी एकाने बंड केले होते. तसेच २०१४ विधानसभा निवडणूकीत भाजपाचे लक्ष्मण जगताप यांच्या विरूद्ध सहा अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले होते. तसेच याचवर्षीच्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी राहुल नार्वेकर यांना होती. त्यावेळी अपक्ष उमेदवार जगताप यांच्याबरोबर राष्टÑवादीचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाचे आमदार जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार रिंगणात उतरविला नाही. अपक्ष राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीतील नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी कमळ चालविले. २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा घोळ कायम होता.

नाना काटे यांना उमेदवारी दिल्याने राहुल कलाटे यांनी बंड केले. पुन्हा तीच खेळी मतविभागणीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाला.  चिंचवडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद आहे. मात्र, त्यांची मोट बांधण्यात नेत्यांना अपयश येत आहे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात विरोधीपक्षनेते अजित पवार यांचा दबदबा कायम आहे. मात्र, त्यांची आजवरच्या तीनही निवडणूकींमधील बोटचेपी भूमिका पाहता, स्थानिक पातळीवरील गटबाजी रोखण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.  आजवरच्या कोणत्याही निवडणूकीत अपयश आल्यानंतर दादांनी ठोस भूमिका घेऊन बंडखोर आणि बंडखोरांना साथ देणाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांचे मनोबल उंचावले आहे. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडीचे सरकार असताना  अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती येताच अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने उभारी घेतली होती. स्मार्ट सिटीपासून कोवीड मधील विविध घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यावरही काहीही झाले नाही. त्यात पुन्हा सरकार पडले. विविध आश्वासने हवेत विरली. त्यामुळे पक्षवाढीबरोबरच पक्षातील फंद फितुरांना वठणीवर आणण्याची गरज आहे. विभागलेली ताकद, एकजूट आणि महाविकास आघाडीची मोट बांधण्याची गरज आहे.     २००९ लोकसभागजानन बाबर (शिवसेना-भाजपा)-५२.७५ टक्केआझम पानसरे (राष्ट्रवादी, काँग्रेस)-४०.५७ टक्के२००९ विधानसभालक्ष्मण जगताप (अपक्ष)- ३८.५३ टक्केश्रीरंग बारणे (शिवसेना)-३५.६० टक्केभाऊसाहेब भोईर (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस)-१२  टक्केविलास नांदगुडे (अपक्ष)- ८ टक्के

२०१४ लोकसभाश्रीरंग बारणे (शिवसेना-भाजपा)-५८.२९ टक्केलक्ष्मण जगताप (अपक्ष)-३०.७८ टक्केराहुल नार्वेकर (राष्ट्रवादी) -५.९५ ट७क्के२०१४ विधानसभालक्ष्मण जगताप (भाजपा)-४६.५८ टक्केराहुल कलाटे (शिवसेना) -२३.७८ टक्केनाना काटे (राष्ट्रवादी) १५.८५टक्केमोरेश्वर भोंडवे (अपक्ष) ८ टक्केकैलास कदम (काँग्रेस) ४ .५८ टक्केअनंत कोºहाळे (मनसे )४ .१२ ट७क्के२०१९ लोकसभाश्रीरंग बारणे(शिवसेना, भाजपा) ६८.७७  टक्केपार्थ पवार (राष्ट्रवादी, काँग्रेस) २७.७१  टक्के२०१९ विधानसभालक्ष्मण जगताप (भाजपा) ५३.९५  टक्केराहुल कलाटे (अपक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) ४०.२९  टक्के२०२३ विधानसभा अश्विनी जगताप (भाजपा) ४५नाना काटे (राष्ट्रवादी) ३५राहुल कलाटे (अपक्ष ) १५

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीpimpri-acपिंपरी