शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा

By admin | Published: February 14, 2017 2:01 AM

पंचक्रोशीतील श्रद्धास्थान वाकड-हिंजवडी गावाचे ग्रामदैवत म्हातोबारायाच्या चरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून

वाकड : पंचक्रोशीतील श्रद्धास्थान वाकड-हिंजवडी गावाचे ग्रामदैवत म्हातोबारायाच्या चरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मावळचे खासदार बारणे यांची सभा घेण्यात आली. यानंतर काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत अवघी वाकडकर जनता सहभागी झाली.शिवसेनेचे उमेदवार अश्विनी वाघमारे, रेखा दर्शिले, राहुल कलाटे, संतोष पवार यांच्या प्रचारार्थ वाकड गावठाण म्हातोबा मंदिर परिसरात घेण्यात प्रचार सभा घेण्यात आली. या वेळी बारणे म्हणाले, ‘‘२००७ ते २०१२ या पंचवार्षिकमध्ये राहुल यांच्या मातोश्री कमल कलाटे नगरसेविका असताना वाकडचा जो विकास झाला तो वाखाणण्यासारखा आहे. यापुढेही वाकड परिसराला प्रगतिपथावर नेण्याचे अव्याहतपणे प्रयत्न सुरू राहतील. शिवसेनेच्या पॅनलला बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख आणि उमेदवार राहुल कलाटे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘पाच वर्षांत वाकड परिसर जेवढा विस्तारला त्या तुलनेत आरक्षणे अद्याप विकसित झाली नाहीत. वाढत्या नागरीकरणानुसार ही आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करण्यावर आमचा भर राहील. येथील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. नागरी सुविधांची वानवा आहे, हे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्याकडे कृती आराखडा आहे. आयटीतील उच्चशिक्षितांचे वाकडला मोठे वास्तव्य आहे. मात्र येथे सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नाईलाजाने त्यांना अक्षरश: गुरा-ढोराप्रमाणे सहा आसनी रिक्षात कोंबले जाते. हे विदारक चित्र पाहून मन हेलावते.’’ सभेनंतर मंदिर परिसरातून खासदार बारणे यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीत वाकड, पुनावळे, ताथवडेतील ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते आणि महिलांनी लक्षणीय सहभाग घेतला. जनसमुदायातून ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा गर्जनांनी परिसर दुमदुमून गेला. भगवे झेंडे व धनुष्याने वाकडचे सर्व रस्ते भगवे झाले होते. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीत शिवसेनेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. (वार्ताहर)