शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

लहान विद्यापीठांची निर्मिती गरजेची

By admin | Published: March 22, 2017 3:07 AM

देशातील विद्यापीठांची संख्या सुमारे ७१५ असून, या विद्यापीठांचा व्याप मोठा आहे. त्यामुळेच देशातील विद्यापीठांची गणना जागतिक

देशातील विद्यापीठांची संख्या सुमारे ७१५ असून, या विद्यापीठांचा व्याप मोठा आहे. त्यामुळेच देशातील विद्यापीठांची गणना जागतिक विद्यापीठांच्या यादीत होत नाही, असे नमूद करून खेडकर म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या सुमारे ७००च्या घरात आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या कुलगुरूंची आणि अधिकाऱ्यांची शक्ती या महाविद्यालयांचे प्रश्न सोडविण्यातच खर्ची होते. परिणामी मोठ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना विद्यापीठाची आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे देशभरात सुमारे ४ ते ५ हजार लहान-लहान विद्यापीठांची निर्मिती होणे आवश्यक आहे. अमेरिका व चीन यांसारख्या देशांमध्ये लहान विद्यापीठांची संख्या मोठी असल्यानेच या देशातील अधिकाधिक विद्यापीठांची गणना जागतिक विद्यापीठांच्या यादीत होत आहे.खेडकर म्हणाले, की विद्यापीठांचा पसारा लहान असल्यामुळे कुलगुरूंना विकासकामे करणे आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे सहज शक्य होते. तसेच संशोधनाशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात संशोधनासाठी अधिकाधिक तरतूद करणे गरजेचे आहे. तसेच प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रम आखणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे.शासकीय विद्यापीठांबरोबरच खासगी व अभिमत विद्यापीठे शिक्षण क्षेत्रात मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. अलीकडच्या काळात या विद्यापीठांमधील विद्यापीठांचे प्रवेश शासनामार्फत केले जात आहेत. त्यामुळे या विद्यापीठांसमोर निधी उभा करण्याचे मोठे आव्हान आहे, असे नमूद करून खेडकर म्हणाले, देशातील आयआयटी, आयआयएम यांसारख्या संस्थामध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थी परदेशात जातात. शासनाकडून या संस्थांमधील विद्यार्थ्यांवर मोठा खर्च केला जातो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा उपयोग देशाच्या विकासाला हातभार लावून घेण्यासाठी कसा करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे.‘एमबीए’विषयी बोलताना खेडकर म्हणाले, जागतिक मंदीमुळे ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांच्या रोजगारावर परिणाम झाला होता. परंतु , आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे व्यवस्थापन क्षेत्रात काम करत देशाचे आणि जगाचे नेतृत्व करण्याची संधी एमबीएच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनातर्फे डिजिटल इंंडिया, स्टार्ट अप, स्किल इंडिया यांसारख्या महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. देशात तरुणांची संख्या जास्त असल्याने या योजनांचा फायदा निश्चितपणे त्यांना होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाल्याशिवाय उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.नवीन विद्यापीठ कायद्याबाबत खेडकर म्हणाले, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात अनेक महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठातील निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमधून नवे नेतृत्व उभे राहू शकेल. परंतु निवडणुकांमुळे महाविद्यालयांचे वातावरण बिघडणार नाही याची खबरदारी शासनाने घ्यायला हवी, अशी अपेक्षाही खेडकर यांनी व्यक्त केली.