पिंपरी : केंद्र सरकारकडून जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेल्या प्रकल्पांसाठी नेमलेल्या क्रिसील या सल्लागार संस्थेच्या चुकीच्या सल्ल्यांमुळे अनेक प्रकल्पांचे नुकसान झाल्याचा, दावा स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला. तसेच सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव लांबणीवर टाकला आहे.समितीपुढे बुधवारी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विषय होता. मात्र, त्याला स्थायी समितीने विरोध केला. यापूर्वीच्या कंपनीमुळे पालिकेचे जेएनएनयुआरएममधील प्रकल्प फसल्याचे सीमा सावळे यांनी म्हटले. यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्प सल्लागार नेमण्याचा विषय प्रलंबित ठेवला आहे. रखडलेल्या प्रकल्पांबाबत म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. (प्रतिनिधी)
स्मार्ट सिटी प्रकल्प लांबणीवर
By admin | Published: April 14, 2017 4:22 AM