शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

Women's Day Special: खाकी वर्दीतील 'स्मिता' गाजवते कुस्तीचा आखाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 12:29 PM

जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभाग होत आपल्या देशाचे नेतृत्व करावे, अशी स्मिता यांची इच्छा

रोशन मोरे

पिंपरी : कुस्ती हे येऱ्यागबाळ्याचे काम नाय..असं हिंदकेसरी मारूती माने म्हंटले होते. ते काही खोटं नाही. अगदी लहानपणापासूनच पैलवान घडवला जातो. त्याला तसा आहार आणि त्याच्याकडून शारिरीक  मेहनत करून घेतली जाते. महिला, मुली या क्षेत्रात तश्या दुर्लक्षीतच पण वयाच्या २४ व्या वर्षी कुस्तीच्या आखाड्यात उतरून एका महिला पोलिसाने खाकी वर्दीची स्मिता जपली. त्या महिला पोलिसाचे नाव स्मिता पाटील. स्मिता या सध्या पिंपरी-चिंचवडच्या सायबर शाखेत पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत.

स्मिता यांचे वडिल निवृत्त सैनिक. त्यांच्याच प्रोत्साहानामुळे त्या वयाच्या १८ व्या वर्षी त्या पोलीस दलात भरती झाल्या. स्मिता यांचे पती रणधीर माने हे देखील पोलीस दलात कार्यरत असून ते देखील कुस्तीपट्टू आहेत. त्यांनीच स्मिता यांना कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहान दिले. त्यांना कुस्तीविषयक प्राथमिक धडे दिले. तर, पोलीस खात्यातील बाजीराव कळंत्रे यांनी देखील स्मिता यांना मार्गदर्शन केले. खेळाडू ज्या  वयात परिपक्कव होतो त्या वयात कुस्तीचे धडे घेत अस्मिता यांनी आपल्या कुस्तीने दरारा निर्माण केला. २०१६ पासून स्मिता या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत कुस्ती  या खेळात सहभागी होत आहेत. फक्त एक वर्ष अपवाद सोडले तर प्रत्येक वर्षी स्मिता यांनी पदकाची कमाई केली आहे.  अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत भाग घेत त्यांनी दोन कांस्य तर, आर्म रेसलिंगमध्ये सुवर्ण पदाकाची कमाई केली आहे.

देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा

स्मिता यांचे सासरे रमेश माने हे नामांकित पैलवान. त्यांना राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. तर, स्मिता यांचे पती हे देखील कुस्तीपट्टू. सासरकडील हा वारसा स्मिता यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलला आहे. स्मिता यांना आर्म रेसलिंगमध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यामुळे जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभाग होत आपल्या देशाचे नेतृत्व करावे, अशी स्मिता यांची इच्छा आहे.

मी जेंव्हा स्पर्धेत सहभागी होण्यास सुरवात केली तेंव्हा मुली या खेळाकडे वळत नव्हत्या. मात्र, आता हे चित्र पूर्णपणे बदल आहेत. मोठ्या संख्येने मुली कुस्तीचे धडे गिरवत आहेत. करिअर म्हणून कुस्ती क्षेत्राकडे पाहत आहेत. त्याचा मला जास्त आनंद आहे. - स्मिता पाटील, कुस्तीपट्टू

स्मिता पाटील यांची कुस्ती स्पर्धेतील कामगिरी

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा (कुस्ती)

सन २०१६ (कांस्य)सन २०१७ (रौप्य)सन २०१८ ----सन २०१९(सुवर्ण)सन २०२३ सुवर्ण

अखिल भारतीय पोलीस क्रिडा स्पर्धा (कुस्ती)

सन २०१५ कांस्यसन २०१७ कांस्यसन २०२२ सुवर्ण (आर्म रेसलिंग)पोलीस महासंचालक पदक 2022 मध्ये प्राप्त

टॅग्स :PuneपुणेWomen's Day Specialजागतिक महिला दिनWrestlingकुस्तीSocialसामाजिक