पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यरत होण्याच्या आदल्या रात्री १४ आॅगस्टला पुणे शहरातील काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेकायदा बदल्या करण्यात आल्या. ही बाब पोलीस महासंचालकांच्या निदर्शनास आणून दिली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत नेमणूक झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पुणे आणि ग्रामीण हद्दीत जाऊ लागले आहेत. प्रशासकीय नियंत्रण पोलीस आयुकत पिंपरी चिंचवड यांच्याकडे असून मी तुमचा प्रशासकीय नियंत्रण अधिकारी आहे, त्यामुळे कोणी धाक, प्रलोभन दाखवले तरीही कोणीही इकडे तिकडे जाऊ नये. असा सज्जड इशारा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी थेट वायरलेसवरून पोलिसांना दिला आहे. पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होण्याच्या आदल्या दिवशी पुण्यात पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पिंपरी चिंचवडसाठी नेमणुक केलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्रीत पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी पुणे शहर व ग्रामीण हद्दीत बदली केली. मात्र या बदल्या बकायदा असल्याची बाब त्याचवेळी निदर्शनास आणून दिली. १ आॅगस्ट २०१८ ला जे पोलीस अधिकारी, कर्मचारी ज्या ठिकाणी नेमणुकीस आहेत, ते त्याच ठिकाणी राहतील, असा पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी आदेश दिला होता. त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आहे. त्याच ठिकाणी काम करावे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्याकडून काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संपर्क साधून, दमबाजी करून पुणे शहर अथवा ग्रामीणकडे येण्यासाठी धमकावले जात आहे. १४ आॅगस्टला झालेल्या बेकायदा बदल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्य नाहीत. पुण्यातील वरिष्ठांनी दूरध्वनीवरून संपर्क साधताच कमकुवत अधिकारी पुण्यात जात आहेत. हे शिस्तीला धरून नाही. मी तुमचा प्रशासकीय अधिकारी आहे, कोणी भीती दाखवली, प्रलोभन दाखवले तरी भीती बाळगण्याचे कारण नाही. भविष्याची चिंता करण्याचे कारण नाही. ज्यांना पुण्यात जाण्याची इच्छा आहे, त्यांनी तशी विनंती केल्यास विचार करता येईल. वरिष्ठांच्या आदेशाला घाबरून काही तिकडे हजर झाले होते, ते पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये हजर झाले आहेत. ही चांगली बाब आहे. यापुढे माझ्या परवानगीशिवाय कोणी पुणे शहर अथवा ग्रामीणकडे जाऊ नये. पुणे शहरातील कोणीही अधिकारी तुमच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करू शकत नाहीत. तुम्ही माझ्या नियंत्रणाखाली आहात. अशा शब्दात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले.
....तर माझा ‘वॉच’ तुमच्यावर असेल : आयुक्त मकरंद रानडे यांचा पोलिसांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 7:15 PM
मी तुमचा प्रशासकीय अधिकारी आहे, कोणी भिती दाखवली, प्रलोभन दाखवले तरी भीती बाळगण्याचे कारण नाही. भविष्याची चिंता करण्याचे कारण नाही...
ठळक मुद्दे१४ आॅगस्टला झालेल्या बेकायदा बदल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्य नाहीवरिष्ठांच्या आदेशाला घाबरून काही तिकडे हजर झाले होते, ते पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये हजर