पिंपरी : चिखली स्पाईन रोड, नक्षत्र सोसायटी शेजारी एका गोडावूनमध्ये रासायनिक पॉवडरची पोती टाकली जात आहेत. नागरिकांना दुर्गंधी येत आहे. त्यामुळे श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिका पर्यावरण विभागाने पाहणी करून गोडावून सील केलं आहे. मालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
चिखली स्पाईन रोड, नक्षत्र सोसायटी शेजारी, चेरिज स्वीटसच्या समोर मोकळया प्लॉटमध्ये दगड मातीसह कुदळवाडीतील कचरा आणून टाकला जात आहे. तसेच काही पोती आणली जात आहेत. दिनांक १६ फेब्रुवारी पहाटे या ठिकाणी आग लागली. त्यानंतर आग विजविण्याकरीता अग्निशामक दलाने आतापर्यंत दोन वेळा येवून आग विझवली. त्यानंतर या भागात पुन्हा धूर वाढत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात असणाºया नागरिकांना श्वसनाचा त्रास या भागातील नागरीकांना जाणवत आहे. तसेच ६ मजली व १२ मजली ईमारतीमध्ये मोठयाप्रमाणावर नागरिक राहतात. संबंधित परिसर हा प्राधिकरणाच्या हद्दीत आहे, येथील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून कारवाई करावी, अशी मागणी केली होती. येथील पोती अमोनियाची आहेत, असा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे.
गोडावूनमध्ये पोती कशाची तपासणी करावी
येथील एका गोडावून मध्ये रासायनिक पावडरची पोती पडलेली आहेत. तसेच परिसरातही अनेक पोती आहेत. त्यावर पाणी पडले की त्यातून धूर येतो. व हा धूर शेजारी असणाऱ्या सोसायत्यामध्ये जात आहे. हा उग्र वास असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. ही पोती कोणत्या पॉवरडरची आहेत, याबाबत पर्यावरण विभागास माहिती मिळालेली नाही.
गोडावून केले सील
महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर आज महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि अधिकारी यांचे पथक घटनास्थळी गेले. व गोडावून सील केले.
सोसायटीच्या जवळच असणाºया मोकळ्या जागेत काही पोती आणून टाकली जात आहेत. अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेचे पथक गेले आहे. परिसर सील केला आहे.एकनाथ पवार, (माजी सत्तारूढ पक्षनेते)
एका गोडावूनमध्ये रासायनीक पावडरची पोती असून त्यामुळे दुर्गंधी येत आहे. अशी तक्रार नागरिकांनी केली होती. त्यानुसार पाहणी केली असता, पोत्यांवर पाणी पडले की धूर निघत होता. ही पॉवडर रासायनिक असावीत, असे जाणवल्याने गोडावून सील करून प्रदूषण नियंत्रण मंडळास कळविले आहे.- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग.