सोशल मीडियाचे प्रबोधन
पिंपरी : मतदान जनजागृतीकरिता स्थानिक केबलवर मतदान जनजागृती मार्गदर्शक चित्रफित प्रसारित केली जात आहे. आकाशवाणीद्वारे मतदार जागृती केली आहे. शहरातील सिनेमागृहांमध्ये जनजागृतीची मार्गदर्शक चित्रफित व मान्यवरांची आवाहनपर चित्रफित प्रसारित केली आहे. सोशल मीडिया - फेसबुकवर मार्गदर्शक चित्रफित व मान्यवरांची आवाहनपर चित्रफित प्रसारित केली आहे.
पाच लाख नागरिकांना आवाहन
मोबाइल एसएमएसद्वारे सुमारे पाच लाख नागरिकांना मतदानाचे आवाहन संदेश पाठविण्यात येणार आहेत. झोपडपट्ट्या, मॉल, सोसायट्या, भाजी मंडई, उद्याने, बसस्टॉप, कारखाने व इतर ठिकाणी मनपा हद्दीत सुमारे १३ लाख आवाहनपत्रकांचे वाटप केले असून, सुमारे तीन हजार फ्लेक्सद्वारे जनजागृती केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यींची मतदान जनजागृतीची पथनाट्य, व्यंगचित्र, स्किट,कोलाज,वक्तृत्व स्पर्धा झाली. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये पालक मेळावे झाले. त्या वेळी शिक्षकांना व पालकांना मतदान जनजागृतीचे मार्गदर्शन व आवाहन केले. डॉक्टर व वकील यांच्या बैठका घेण्यात आल्या. मोबाईल व्हॅन,एल.ई.डी. स्क्रीनद्वारे जनजागृती केली.
लोकप्रिय कलावंतांनीही केले आवाहन
शहरात ३०० पथनाट्याद्वारे जनजागृती केली. ७१ झोपडपट्ट्या, ६ मॉल, १७० उद्याने सोसायट्या, भाजी मंडई, बसस्टॉप, कारखाने, हॉस्पिटल, गस्तीचे चौक, रेल्वे स्टेशन, ज्येष्ठ नागरिक संघ, सात पालक सभा, १५ महाविद्यालये, १२ मार्केट, तसेच इतर ठिकाणी मिळून चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मराठी मालिकेतील कलावंतांचा समावेश असलेली चित्रफित सादर केली आहे. जनजागृतीपर ध्वनिफित तयार केली असून, ती व्हॉट्स अप, फेसबुकद्वारे प्रसारित केली आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यक्तींच्या आवाहनपर मुलाखती झाल्या आहेत. शहरातील औद्योगिक १७ कंपन्यांमध्ये व ४ आयटी पार्क कर्मचाºयांची कार्यशाळा घेऊन मतदान जनजागृती केली.
मतदानादिवशी प्रवासासाठी सूट
सोसायट्या, लग्न समारंभात मार्गदर्शनपर जनजागृती केली. शहरात २० ठिकाणी स्काय बलूनद्वारे जनजागृती, मतदार जनजागृतीपर सायकल रॅली, महाविद्यालयीन विद्यार्थी रॅली, तसेच पीएमपीच्या ५०० बसवर, ५०० आॅटोरिक्षा, १ लाख ३० हजार सिलिंडर, बँका, रुग्णालये, दवाखाने या ठिकाणी जनजागृतीचे स्टिकर लावण्यात आले. शहरातील सर्व एटीएम सेंटरवर मतदान जनजागृती स्टिकर डकविण्याचे काम सुरू आहे. मतदान केलेल्या मतदारांना उबेर या खासगी वाहन संस्थेद्वारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासासाठी रक्कम रुपये ५० ची सवलत देण्यात येणार आहे.