पिंपरी - पूर्वीची ‘ती’ मुलगी, सून, पत्नी, माता या भूमिकेबरोबरच प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, उद्योजक, शिक्षक, पत्रकार व पोलीस अशा वेगवेगळ््या भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे. बदलत्या परिस्थितीत ‘ती’च्या अभिव्यक्तीची माध्यमे व साधने बदलत आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षित महिलांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटर या सोशल मीडियावर ८ मार्चला विविध उपक्रम व चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. महिलांच्या अभिव्यक्तीचे सोशल मीडिया व्यासपीठ ठरू लागला आहे.पारंपरिक रितीरिवाजाची अनेक बंधने तिच्यावर होती. त्यामुळे तिला अबला समजले जात होते. तिचे सबलीकरण व सक्षमीकरणासाठी आरक्षणासह अनेक महत्त्वाचे निर्णय काळाबरोबर घेण्यात आले. ‘ती’ घरातून बाहेर पडून शिक्षण घेऊ लागली. पूर्वी अन्याय व अत्याचाराला एकटीला सामोरे जावे लागत होते. आता महिला संघटित झाल्या आहेत.आपले प्रश्न व समस्या मांडण्यासाठी उच्च शिक्षित महिलांनी आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून #मुलगी वाचवा, #मुलगी शिकवा, #सावित्रीच्या लेकी, #कोपर्डी, #निर्भया, #सॅनिटरी-नॅपकिन असे विविध हॅशटॅग वापरून त्याविषयी चर्चा व जनजागृती घडविण्यात त्या पुढाकार घेत आहेत. वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून त्यांच्या मुलाखती सर्वदूर पोहोचत आहेत. त्या आता व्हॉट्सअॅप व फेसबुकवर आपल्या समस्या व अनुभव शेअर करताना संकोचत नसल्याचे दिसून येत आहे.#महिलादिनाचे हॅशटॅगजागतिक महिला दिनानिमित्त सोशल माध्यमांवर वावरणाºया स्त्रियांना बिनधास्त व्यक्त होण्यासाठी #महिलादिन हा हॅशटॅगचे खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. टिष्ट्वटरवरील मराठी ब्रेन (मराठी विश्वपैलू पेज) यांच्यासह अनेक टिष्ट्वटरवर महिलांच्या मदतीने हा उपक्रम सुरू असून उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. या उपक्रमासाठी मराठी रीटिष्ट्वट, हॅशटॅग मराठी यांच्यासह अनेक पेजचे सहकार्य मिळाले आहे.मराठी टिष्ट्वटरकट्टाचा अनोखा उपक्रमटिष्ट्वटरवर मराठीब्रेन आणि मराठीविचार यांच्यावतीने मराठी टिष्ट्वटरकट्टा हा संयुक्त उपक्रम चालविला जातो. यामध्ये सामान्य ते विविध क्षेत्रांतील नामवंत महिला यांच्यासोबत टिष्ट्वटच्या माध्यमातून प्रश्न-उत्तर पद्धतीने संवाद साधला जातो. याआधीही अनेक क्षेत्रांतील महिला या टिष्ट्वटरकट्टयावर सहभागी झाल्या आहेत. गुरुवारी (दि. ८) सकाळी ११वा. मराठी-हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाºया मराठमोळ्या अभिनेत्रीशी संवादाचे आयोजन केले आहे.
‘ती’च्या अभिव्यक्तीसाठी सोशल मीडियाचे व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 3:21 AM