शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

माणुसकीचा झरा हरवतोय, सोशल मीडियाचा परिणाम, मदतीपेक्षा जखमींची छायाचित्रेच व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 4:41 AM

एखादा अपघात अथवा दुर्घटना घडल्यास बघ्यांची गर्दी जमते. अनेक जण अपघातस्थळावरील छायाचित्रे मोबाइलमध्ये कैद करतात. जखमींची रक्तरंजित छायाचित्रे काही वेळातच व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतात.

पिंपरी : एखादा अपघात अथवा दुर्घटना घडल्यास बघ्यांची गर्दी जमते. अनेक जण अपघातस्थळावरील छायाचित्रे मोबाइलमध्ये कैद करतात. जखमींची रक्तरंजित छायाचित्रे काही वेळातच व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतात. अपघातात ठोकर देणारे आणि एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-या वाहनाचा तपशील मात्र कोणाकडे मिळत नाही.अपघात स्थळावर गर्दी करून अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळवून देण्याऐवजी तेथील जखमींची छायाचित्रे काढून मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ती पाठविण्याची अनेक जण घाई करतात. चिंचवडला विद्युत डीपीतून इंधन गळती होऊन गटई कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्या वेळी काहींनी आगीत होरपळून निघणाºया गटई कामगाराचे मोबाइलवर छायाचित्रण केले. परंतु गटई कामगाराला वाचविण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. मागील वर्षी घडलेली ही घटना बघ्यांच्या गर्दीत माणुसकी हरविल्याचे सूचित करणारी ठरली असताना, महिनाभरापूर्वी भोसरीत अशीच घटना घडली. अपघातात जखमी होऊन पडलेल्या एका जखमी व्यक्तीचे मोबाईलवर छायाचित्र घेण्यास सरसावणारे अनेक जण होते. परंतु त्यांच्यापैकी कोणी मदतीला धावून आले नाही. या मार्गाने जाणाºया एका डॉक्टरने थांबून जखमीला मदत केली. मोबाइलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णवाहिका, पोलीस यांचीही मदत तातडीने मिळविणे शक्य असते.अपघाताच्या अनेक घटनांमध्ये प्रामुख्याने अपघातात एखाद्याचा मृत्यू होतो, अशा वेळी ठोकर देऊन गेलेले वाहन अज्ञात असल्याची नोंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतात. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी होते, त्या वेळी अनेक जण मोबाइलमध्ये छायाचित्र घेत असतात. त्या वेळी अपघातातील वाहनांचे अपघात स्थळावरील वाहन क्रमांक सुस्पष्ट दिसेल असे छायाचित्र व्हारल झाल्यास पोलिसांना संबंधित वाहनचालकावर कारवाई करणे भाग पडेल. अज्ञात वाहनचालक म्हणून कारवाईतून त्याची सुटका होणार नाही. शिवाय विमा योजनेचे काही लाभ अपघातग्रस्तांना मिळणार असतील, तर ते लाभसुद्धा घेता येतील.आरटीओ : वाहनचालकाची माहिती देणारे अ‍ॅपअपघातस्थळावरील वाहनांचा क्रमांक मोबाइलवर उपलब्ध असलेल्या वाहतूक विभागाच्या अ‍ॅपमध्ये टाकल्यास काही क्षणात त्या वाहनाची मालकी, आरटीओ नोंदणी आणि अन्य तपशील मोबाइलच्या स्क्रिनवर उपलब्ध होतो. या अ‍ॅपविषयी नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. अपघातातील वाहनांची छायाचित्र आणि माहिती नागरिकांकडून पोलिसांना वेळीच मिळाली तर त्या वाहन चालकांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. चांगल्या अर्थाने स्मार्ट फोनचा आणि सोशल मीडियाचा उपयोग अशा पद्धतीने होऊ शकतो. केवळ जखमींची छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्यापेक्षा जखमींच्या, दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठीही त्याचा उपयोग व्हावा, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया