पिंपरी : अखिल चिंचवड नवरात्र महोत्सव २०१५ या सोहळ्याच्या निमित्ताने केलेला स्त्रीशक्तीचा गौरव म्हणजे सामाजिक संवेदना जागृत असल्याचे निदर्शक आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.महासाधू मोरया गोसावी मंदिराजवळ मोरया उद्यानासमोरील पटांगणात गौरव सोहळ्यास पिंपरी- आयुक्त राजीव जाधव, शिवसेना शहर प्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, उद्योजक एस. बी. पाटील, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सतीश गडाळे, संयोजिका नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि गजानन चिंचवडे उपस्थित होते.आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडीत असताना समाजातील विविध क्षेत्रांतील ठसा उमटवणाऱ्या महिलांचा खासदार बारणे यांच्या हस्ते आदिशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आदिशक्ती पुरस्कारांमध्ये सुशीला खिंवराज मुथा, चंद्रभागा धोंडिबा नामदे, सावित्रीबाई वाल्हेकर, निर्मला शिवाजी ढमाळ, यमुनाबाई सदाशिव बोत्रे, कांताबाई तात्याबा भिसे, प्रभावती बळवंत पडवळ, मोहिनीबेन सोनिगरा, अनसूया मधुकर चिंचवडे, इंदुमती भिकाजी चिलेकर, सायरा नजीर सय्यद यांच्यासह श्री. व सौ. पुरस्काराने रजनी दुवेदी व प्रभाकर यशवंत दुवेदी यांचा सन्मान केला.शहर अभियंता तुपे यांच्या हस्ते पारंपरिक वेशभूषा स्पर्धेतील श्रुती हिवरेकर (प्रथम), मनीषा पाटील (द्वितीय) आणि शीतल आगरखेड (तृतीय) यांना पारितोषिके देण्यात आला. आकर्षक लकी ड्रॉमध्ये सरोज गिरीष हवेली, स्वाती बाळकृष्ण कदम, माधवी मंगेश चव्हाण, रुपाली गणेश गावडे, सुनीता संजय साळुंखे, चंद्रिका राजेंद्र शिंगी, शबाना हमीद मुलाणी, दमयंती दत्तात्रय श्ािंदे, श्रद्धा शैलेश लोहोकरे, सुनीता संतोष लुनीया यांनी बक्षिसे जिंकली.‘झाले छत्रपती शिवराय’ या ऐतिहासिक नाट्यातील पारंपरिक गोंधळाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. विजय पानसरे यांच्या वाद्यवृंदाच्या पारंपरिक लोकगीतांच्या ठेक्यावर पाच वर्षांच्या चिमुरडीपासून ते ज्येष्ठ महिलांनी फेर धरून महाभोंडल्याची रंगत वाढवली. माया सरसर, स्वाती चौधरी, अनिता कोळसुने, दर्शना संगमे, पूजा पाखरे, मीरा बारसावडे, सुनीता खरात, माधवी पवार, रुपाली घाडगे, सुनीता कळसकर, कोंडेकर यांनी संयोजन केले. शुभांगी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)
‘सामाजिक संवेदना जागृत’
By admin | Published: October 16, 2015 12:44 AM