पिंपरी : रहाटणी येथील निर्भया महिला मंचातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या संदीप खरे व डॉ सलील कुलकर्णी यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध झाले.सलील - संदीप या जोडीने ‘चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, हे भलते अवघड असते...’, ‘मी मोर्चा नेला नाही...’ ‘ नसतेस घरी तू जेव्हा ...’, ‘दमलेल्या बापाची ही कहाणी...’, ‘ना मंजूर...’, ‘आग्गोबाई ढग्गोबाई...’, ‘राणी माझ्या मळ्यामंदी...’, ‘देवा मला रोज एक अपघात कर...’ अशी गाजलेली गाणी सादर केली. या वेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी नगरसेवक संतोष कोकणे, कोकणे चौक ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक शरद कोकणे, निर्भया महिला मंचाचे अध्यक्ष उल्हास कोकणे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत गुंड आदी उपस्थित होते. या वेळी निकिता यादव, ज्योती कोल्हे, दीपाली सोनी, श्रुती हिवरेकर, सविता सोनवणे या रांगोळी स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत ३० महिला सहभागी झाल्या. वसुधा दाऊदखाने, प्रमिला मंत्री, ऊर्मिला म्हसवडे, सीमा चिंचणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)
‘आयुष्यावर बोलू काही’ने जिंकले
By admin | Published: March 11, 2016 1:27 AM