रहाटणी : प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधील मागास प्रवर्ग पुरुष या गटातील अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांनी पदयात्रा काढत मतदारांच्या भेटीगाठीवर जोर दिला असून, प्रभागात ‘शिट्टी’चा आवाज घुमत आहे. सोमनाथ तापकीर यांनी फिनोलेक्स कॉलनी, तुकाराम नढे कॉलनी, गजराज कॉलनी, अश्विनी कॉलनी, श्रद्धा कॉलनी, सूर्यकिरण कॉलनी, चंद्रकिरण कॉलनी, मातृछाया कॉलनी आदी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेत शिट्टीला मतदान करण्याची विनंती केली. त्यांच्या या प्रचारात महिला, पुरुष, तरुण, तरुणी यांनी गर्दी केली होती. या वेळी मतदारांशी संवाद साधताना सोमनाथ तापकीर म्हणाले, ‘‘या प्रभागात राज्याच्या नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून कामानिमित्त येऊन वास्तव्य करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना भयमुक्त जगता यावे, महिलांनाही भयमुक्त वातावरणात राहता यावे यासाठी प्रभागातील वातावरण भयमुक्त करण्याची गरज आहे. हे करण्यासाठी मतदारांनी माझ्या पाठीशी उभे राहावे. येथील नागरी समस्या नागरिकांची पाठ सोडत नाहीत. अरुंद रस्ते, अद्याप न विकसित आरक्षणे अशा अनेक समस्या या प्रभागात आहे. ना उद्यान, ना मंडई अशी या प्रभागाची अवस्था आहे. यावर मात करण्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे, असे तापकीर यांनी सांगितले. (वार्ताहर)
सोमनाथ तापकीरांचा मतदार संवादावर भर
By admin | Published: February 15, 2017 2:07 AM