पिंपरी : शहर फेरीवाला धोरणास लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येणार असून, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी, तसेच रहदारीला अडथळा येणार नाही, याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले. पिंपरी-च्ािंचवड महापालिकेच्या वतीने शहर फेरीवाला समितीची बैठक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.बैठकीस सहायक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, क्षेत्रीय अधिकारी आशा दुरगुडे, सुभाष माछरे, चंद्रकांत खोसे, अण्णा बोदडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भांगरे, पिंपरी-चिंचवड नगरविकास प्राधिकरणाचे पी. आहेरराव, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, रवींद्र जाधव, श्रीनिवास दांगट, सीताराम बहुरे, पोलीस उपनिरीक्षक एस. डी.सय्यद, सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. वाघमारे, उपअभियंता संजय तुपसाखरे, तसेच शहर फेरीवाला समिती प्रतिनिधी काशिनाथ नखाते, दामोदर मांजरे, रफिक शेख, रमेश साळवे, विजय शहापूरकर, मनीषा राऊत, सविता सोनवणे, राजेंद्र वाकचौरे, प्रवीण कांबळे, संतोष जाधव, सरोज अंबिके, भिकाराम कांबळे, डॉ. शिवदास पाटील, कविता खराडे आदी उपस्थित होते.या बैठकीमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण, बायोमेट्रिक सर्वेक्षणातील पात्र फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र वाटप करणे, फेरीवाला समितीवर निमंत्रित सदस्य निवड करणे, तसेच फेरीवाला समितीवरील मृत सदस्याच्या जागी नवीन सदस्याची निवड करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी शहर फेरीवाला समिती सदस्यांनी विविध सूचना व समस्या मांडल्या. (प्रतिनिधी)
लवकरच फेरीवाला धोरण
By admin | Published: September 23, 2016 2:08 AM