वाकड : मूळव्याधीवर उपचार अशी जाहिरातबाजी करून दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्टरवर वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.संदीप विश्वास (रा. नढेनगर, काळेवाडी) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव असून, त्याच्याविरुद्ध महापालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तरवील संगीता तीरुमनी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ पोलिसांकडे तक्रार दाखल होत असल्याची कुणकुण लागताच, आपले बिंग फुटणार या भीतीने बोगस डॉक्टरने दवाखान्याचे शटर बंद करून पळ काढला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिलेली माहिती अशी, संदीप विश्वास याने काळेवाडी येथील तापकीर चौकात दवाखाना थाटला आहे. त्याने कोणतेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही. त्याचबरोबर त्याच्याकडे मेडिकल कौन्सिलचे कोणतेच प्रमाणपत्र नाही. तरीही डॉक्टर असल्याचे भासवून तो उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूट करतो. अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला याबाबतची माहिती मिळताच, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तरवील यांनी या रुग्णालयास भेट दिली. वैद्यकीय शिक्षणाची कोणतीच प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गुन्हा दाखल होताच बोगस डॉक्टर पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 6:24 AM