पिंपरी : मनुष्यबळाद्वारे नदीपात्रातील जलपर्णी काढणे कठीण होत असताना अत्याधुनिक आॅटोमॅटीक यंत्राद्वारे जलपर्णी काढता येईल, अशा प्रकल्पासह अनेक वैशिट्यपूर्ण प्रकल्प डिपेक्स प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. पिंपरीतील, एच. ए. मैदानावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेतर्फे, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ह्यडिपेक्सह्ण प्रदर्शनला शुक्रवार सुरुवात झाली आहे. विविध आधुनिक प्रकल्प प्रदर्शनामध्ये आहेत. डिपेक्ससाठी सुमारे आठशे प्रकल्प आले होते. त्यापैकी निवडक २७० प्रकल्प प्रदर्शनात आहेत. विविध जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १ हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. येथे आॅटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग, रेफ्रिजरेशन, इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल पॉवर, टेलिकम्युनिकेशन्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, केमिकल इंजिनिअरिंग, नॉन कन्व्हेशनल एनर्जी रिसोर्सेस, सिव्हील इंजिनिअरिंग, शोध आणि इंडस्ट्री स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट्स आदी विषयांवरील प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. सध्या जलपर्णीची समस्या कठीण बनली आहे. जलपर्णीमुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. मनुष्यबळाद्वारे जलपर्णी काढणे शक्य होत नाही. दरम्यान, सोलापूर येथील शुभम केसरकर, दर्शना अन्नदाते या विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने आॅटोमॅटीक जलपर्णी यंत्र तयार केले आहे. या त्याद्वारे नदीपात्रातील जलपर्णी काढणे शक्य होते. दैनंदिन जीवन सहज आणि सुकर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध उत्कृष्ठ प्रकल्प सादर केले आहेत. चालकाचे लक्ष नसल्यामुळे अनेकदा अपघात होतात. रस्त्यावर एखादी व्यक्ती अचानक समोर आल्यास चालकाचे लक्ष्य नसले तरी सेन्सरमुळे थांबणारी मोटार विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. (प्रतिनिधी)
जलपर्णी काढण्याची अत्याधुनिक यंत्रणा
By admin | Published: March 20, 2017 4:24 AM