रहाटणी : मागील वर्षापूर्वी चिंचवड येथे विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. त्या ठिकाणी तेल अंगावर पडून पोपट बनसोडे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अगदी आठवड्यापूर्वी डांगे चौकात डीपीला आग लागून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. असे वारंवार का घडते याकडे महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी किंवा रोहित्राच्या जवळ जाऊन काम करणारे नागरिक काहीच धडा घेत नसल्याचे दिसून येत आहे.
गटई कामगार, फळ विक्रते, खाद्यपदार्थ विक्रते, अनधिकृत पार्किंग करणारे वाहनमालक यांसह अनेक व्यावसायिक विद्युत रोहित्र, डीपी, ट्रान्सफार्मरच्या खाली जवळपास व्यवसाय करताना दिसून येत आहेत. एखादा अपघात होण्याच्या आगोदरच त्यांना आवर घालण्याची गरज आहे. सध्या रहाटणी, काळेवाडी व पिंपळे सौदागर परिसराती अनेक मिनी विद्युत डीपी उघडेच आहेत़ त्यामुळे अपघात होऊ शकतात.
रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसरात अनेक व्यावसायिक विद्युत डीपी, उघडे रोहित्र, ट्रान्सफार्मरच्या जवळ किंवा त्याखाली बसून व्यवसाय करीत आहेत. मात्र हा प्रकार कधीतरी जिवावर बेतणारा आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.चिंचवड येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बनसोडे हे अनेक वर्षांपासून येथे गटई काम करीत होते़ मात्र आशा प्रकारे त्यांचा अंत होईल असे त्यांनाही माहीत नव्हते. बनसोडे हे अपंग होते़ त्यामुळे त्यांना कोणत्याच प्रकारची हालचाल करता आली नाही. तर डांगे चौकातीलअपघात का व कसा झाला हे आता तरी कोणालाही सांगता येत नाही त्यात एक अज्ञात व्यक्ती पूर्ण जाळून खाक झाला म्हणून यापासून सर्वांनीच धडा घेणे गरजेचे आहे़ तसेच याकडे विद्युत महावितरण मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.उघड्या वीजवाहिन्यांलगत टाकला जातो कचरा४रहाटणी येथील गारमळा कॉलनी समोर विद्युत डीपी आहे़ या विद्युत डीपीखाली मागील अनेक वर्षांपासून कचरा टाकला जातो़ मात्र या डीपीतून बाहेर आलेले काही वायर मोकळे आहेत़ त्या चालू की बंद हे जरी माहीत नसले तरी या ठिकाणी वायरी चालू असतील तर मोठा अपघात होऊ शकतो़ काही वाहनचालक या डीपीला अगदी लागूनच वाहने पार्क करतात़ त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून महावितरण कंपनीने ही वायर बंद असतील तर ते काढून टाकावेत व सुरू असतील तर त्याची योग्य काळजी घ्यावी़ त्यामुळे एखादा अनर्थ टळू शकतो़