शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

ऑक्सिजन बचतीसाठी विशेष दक्षता घ्यावी:  उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 3:16 PM

लसीकरणामुळे काही प्रमाणात का होई ना कोरोनापासून बचाव होत आहे.

पिंपरी : ४५ वर्षांपुढील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलेल्या नागरिकांमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणामुळे कोरोनापासून काही प्रमाणात बचाव होत असल्याचे निदर्शनास येत असून जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर आमचा भर राहणार आहे. ऑक्सिजन बचतीसाठी विशेष दक्षता घ्यावी, असे मत उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री  पवार यांनी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील वॉर रूमला भेट दिली. त्यानंतर  ते बोलत होते.यावेळी महापौर उषा  ढोरे, उपमहापौर  हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह नगरससदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी वॉर रूममधून होत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. कोरोना रुग्णवाढीचा दर, मृत्यू दर, शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या, उपलब्ध ऑक्सिजन बेड्स, आयसीयु बेड्स, व्हेंटीलेटर बेड्स, बेड मॅनेजमेंट आणि हेल्पलाईन, ऑक्सिजन पुरवठा हेल्पलाईन, प्लाझ्मा हेल्पलाईन, अॅम्बुलन्स हेल्पलाईन, शववाहिका हेल्पलाईन, स्वस्थ आणि टेलीमेडिसिन हेल्पलाईन, कोविड केअर सेंटर आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे कामकाज, महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मी जबाबदार या अॅप, कोव्हिड चाचणी केंद्र आणि लसीकरणाबद्दल अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. क्रिस्टोफर झेव्हियर यांनी माहिती दिली. 

महापालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय आणि थेरगांव रुग्णालयांत सर्व सुविधांची पूर्तता करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रशासनाला दिल्या. अतिरिक्त रुग्णालयांची गरज भासल्यास घरकुल योजनेच्या प्रकल्पांमध्ये त्याबाबत नियोजन करावे अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली. 

पवार म्हणाले, ''महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांचे नातेवाईक आणि इतर व्यक्तींच्या प्रवेशावर नियंत्रण आणणे आवश्यक असून त्यासाठी नियोजन करावे तसेच ऑक्सिजन बचतीसाठी विशेष दक्षता घ्यावी."............शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करावा तसेच शहराला आवश्यक ऑक्सिजन कोटा कमी करू नये आणि आवश्यक लसींची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी यावेळी महापौर उषा ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे केली. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवून आवश्यकतेनुसार त्याचे वितरण करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे असे  पवार यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस