शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

‘त्या’ प्रकरणाच्या तपासाला गती

By admin | Published: March 17, 2016 3:17 AM

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज आत्महत्याप्रकरणी पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.

चिंचवड : चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज आत्महत्याप्रकरणी पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.सुरुवातीला त्यांच्या मोबाइलवर आलेले कॉल रेकॉर्ड तपासले. नंतर त्यांच्या नात्यातील जवळच्या लोकांकडे चौकशी केली. त्यांच्यातील कोणीही आत्महत्येबद्दल संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे वेगळ्या दिशेने तपासाला गती दिली. उपनिबंधक कार्यालये तसेच धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून अद्याप माहिती मिळाली नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे तपास अधिकारी सतीश कांबळे यांनी सांगितले.नातेवाईक आणि विश्वस्तांकडे चौकशी केली असता, देवमहाराज हे गुडघ्याच्या व्याधीने त्रस्त होते. उजव्या गुडघ्याच्या वाटीचे प्रत्यारोपण केले होते. धार्मिक विधी, पूजेच्या वेळी तासन्तास बसून राहणे अथवा उभे राहणे त्यांना त्रासदायक ठरत होते. त्याचा त्रास होत असल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला असावा, असा निष्कर्ष आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात निघाला आहे. हेच कारण असू शकेल, याबद्दल मात्र पोलिसांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेला दोन महिने झाले. त्यांच्या आत्महत्येचे गूढ वाढल्याने अद्यापही वेगवेगळे तर्क-वितर्क काढले जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. धर्मादाय आयुक्त व उपनिबंधक कार्यालयाकडून माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा मिळेल, अशी शक्यता कांबळे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)